शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

फनी चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या  विमान व रेल्वे सेवेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 9:34 PM

‘फनी’ चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या  विमान व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावरील कोलकाताची काही उड्डाणे दि. ३ व ४ मे यादिवशी रद्द करण्यात आली आहेत. तसेच मध्य रेल्वेने गुरूवारी (दि. २) पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात आली.

पुणे : ‘फनी’ चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या  विमान व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावरील कोलकाताची काही उड्डाणे दि. ३ व ४ मे यादिवशी रद्द करण्यात आली आहेत. तसेच मध्य रेल्वेने गुरूवारी (दि. २) पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात आली.

पश्चिम बंगाल व ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवर शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर नागरी विमान वाहतुक महासंचालनालयाने (डीजीसीए) भुवनेश्वर व कोलाकाताला जाणाऱ्या  व तिथून उड्डाण करणाऱ्या  विमानांवर पुढील दोन दिवस बंधने घातली आहेत. कोलकाता येथील विमानतळावरून दि. ३ मे रोजी रात्री ९.३० ते दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ या कालावधीत आणि भुवनेश्वर येथील विमानतळावरून दि. ३ मे रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून रात्री ११.५९ पर्यंत सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यादरम्यान या दोन शहरांकडे जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पुणे विमानतळावरू भुवनेश्वरसाठी विमानसेवा उपलब्ध नाही. मात्र, कोलकातासाठी दररोज सहा विमानांचे उड्डाण होते. मध्यरात्री १२.१५, पहाटे २.५०, ५.३५, सकाळी ११.४०, आणि रात्री १०.३० व ११ यावेळेत पुणे विमानतळावरून कोलकाताला विमानाचे उड्डाण होते. ही उड्डाणे ‘डीजीसीए’च्या निर्णयानुसार संबंधित कालावधीत रद्द असतील. 

विमानसेवेबरोबरच रेल्वे सेवेवर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता पाहून पुढील दोन दिवसात रेल्वेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, त्यापुर्वी दक्षता म्हणून दि. २ मे रोजी पुणे व मुंबई येथून सुटणारी भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे दि. ३ मे रोजी भुवनेश्वर-मुंबई एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. ही गाडी दि. ४ मे रोजी रात्री ११.४५ वाजता पुण्यात येते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :environmentवातावरणrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी