Join us  

राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) भारताच्या सिनियर पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 8:07 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) भारताच्या सिनियर पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहे. १ जुलै २०२४ नंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे आणि त्यासाठी २७ जूनपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख ठऱली आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांनी उत्सुकता दाखवल्यास, प्रश्नच उरणार नाही. पण, सध्यातरी BCCI द्रविडच्या नावाऐवजी दुसऱ्याचाच विचार करत आहेत. 

BCCI या पदासाठी न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ( Stephen Fleming ) यांचा विचार करत आहेत. BCCI च्या प्रमुख अटीनुसार हा प्रशिक्षक भारताच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाला मार्गदर्शन करणारा हवा. आता फ्लेमिंग या पदासाठी अर्ज करतात की नाही, हे पाहावे लागणार आहे. कारण, त्यांनी अर्ज केल्यास किमान १० महिने त्यांना संघासोबत रहावे लागेल. 

BCCI ने सोमवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय पुरुष संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली. बोर्डातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ पासून CSKचे मुख्य प्रशिक्षक असलेले फ्लेमिंग यांच्याकडे द्रविडकडून पदभार स्वीकारण्यासाठी योग्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. भारत पुढील काही वर्षांमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये संक्रमणाच्या काळात प्रवेश करेल आणि फ्लेमिंगचे कौशल्य, सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आणि CSK मधील त्याचा प्रभावशाली यशाचा दर हा महत्त्वाचा मानला जात आहे. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार याबाबत आयपीएल दरम्यान अनौपचारिक चर्चा झाली आहे. ५१  वर्षीय फ्लेमिंगने फ्रँचायझी सोडण्याच्या कोणत्याही इच्छेबद्दल CSK व्यवस्थापनाशी संवाद साधला नाही. २००९ मध्ये CSK चे मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून, फ्लेमिंग हे जगभरात लोकप्रिय ट्वेंटी-२० प्रशिक्षक बनले आहेत. त्यांनी चार वर्षे बिग बॅशमध्ये मेलबर्न स्टार्सचे प्रशिक्षकपद भूषवले. ते SA20 मधील जॉबर्ग सुपर किंग्ज आणि मेजर लीग क्रिकेटमधील टेक्सास सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक देखील आहेत. द हंड्रेडमध्ये ते सदर्न ब्रेव्हचा मुख्य प्रशिक्षकही आहे.  

फ्लेमिंग यांनी आयपीएलमध्ये लीगमध्ये सर्वाधिक काळ सेवा देणारे प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी CSK ला पाच विजेतेपद आणि दोन चॅम्पियन्स लीग ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत. 

BCCI च्या अटी- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयचेन्नई सुपर किंग्सराहुल द्रविड