कामशेत स्टेशनवरील कामामुळे लोणावळ्यातून सुटणाऱ्या काही लोकल रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 14:52 IST2022-12-10T14:51:47+5:302022-12-10T14:52:01+5:30

पिंपरी : कामशेत रेल्वे स्टेशनवर ब्लॉक घेवून करण्यात येणाऱ्या कामाचा परिणाम पुणे- लोणावळा लोकलच्या वेळापत्रकावर होणार आहे. शनिवार (दि.१०) ...

Due to work at Kamshet station, some local trains departing from Lonavala have been cancelled | कामशेत स्टेशनवरील कामामुळे लोणावळ्यातून सुटणाऱ्या काही लोकल रद्द

कामशेत स्टेशनवरील कामामुळे लोणावळ्यातून सुटणाऱ्या काही लोकल रद्द

पिंपरी : कामशेत रेल्वे स्टेशनवर ब्लॉक घेवून करण्यात येणाऱ्या कामाचा परिणाम पुणे-लोणावळा लोकलच्या वेळापत्रकावर होणार आहे. शनिवार (दि.१०) ते मंगळवार (दि. १३) या चार दिवसांच्या कालावधीत पुणे-लोणावळा आणि लोणावळा-पुणे या मार्गावरील लोकल उशिरा धावणार असल्याची माहिती रेल्वेप्रशासाकडून देण्यात आली आहे.

पुणे-लोणावळा मार्गावर शनिवार (दि.१०) पासून पुणे स्टेशनमधून ९.५५ ची लोणावळा लोकल ११.१७ मिनिटांनी पुणे स्टेशनमधून सुटेल. दुपारी तीनला पुणे-तळेगाव धावणारी लोकल तीन वाजून ४२ मिनिटांनी सुटले. तर, लोणावळ्यावरून पुण्याकडे रवाना होणारी दुपारी दोन वाजून ५० मिनिटांची लोकल, दुपारी साडेतीनची लोकल, तसेच सायंकाळी साडेपाचची लोकल आणि तळेगाव-पुणे दुपारची चार वाजून चाळीस मिनिटांची लोकल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शिवाय मंगळवारी (दि. १३) पुण्याहून लोणावळ्यासाठीची दुपारी चार वाजून २५ मिनिटांची लोकल तसेच तसेच लोणावळ्यावरून पुण्यासाठीची सहावाजून २० मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Due to work at Kamshet station, some local trains departing from Lonavala have been cancelled