शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे पुणे महापालिकेत पुन्हा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 17:02 IST

स्मार्ट या संस्थेकडून मानधन तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्यामुळे महापालिकेत पुन्हा प्रशासन पदाधिकारी असा वाद सुरू झाला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना कामावर घ्यावे यासाठी महापालिकेतच केले आंदोलन महापौर आणि उपमहापौर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करण्याचे दिले आश्वासन

पुणे : स्मार्ट या संस्थेकडून मानधन तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्यामुळे महापालिकेत पुन्हा प्रशासन पदाधिकारी असा वाद सुरू झाला आहे. कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे म्हणून पदाधिकारी आग्रही आहेत तर महापालिकेचे कायम कर्मचारी उपलब्ध असताना त्यांना कामावर का घ्यावे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर त्यांना कामावर घ्यावे यासाठी महापालिकेतच आंदोलन केले.स्मार्ट या संस्थेकडून महापालिकेत गेली अनेक वर्षे संगणकावर काम करणारे कर्मचारी मानधन तत्वावर घेतले जातात. त्यांना महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातून जशी मागणी असेल त्याप्रमाणे पाठवले जाते. महापालिकेत संगणकाद्वारे काम सुरू झाले त्यावेळी महापालिकेच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना संगणकावर काम करता येत नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी उपयुक्तता जास्त होती. त्यानंतर महापालिकेचे बहुतेक कायम कर्मचारी संगणक आॅपरेटिंग शिकले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची गरज संपली. मात्र त्यांना काम मिळावे यासाठी त्यांची नियुक्ती तशीच ठेवली गेली.महापालिकेच्या कामाचा व्यापही वाढत गेल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामही होते. मात्र आता प्रशासकीय खर्चही वाढत असल्यामुळे प्रशासनाने काही दिवसांपुर्वीपासून कंत्राटी कामगारांना कमी करणे सुरू केले आहे. १ हजार ८०० सुरक्षा रक्षकांपैकी ९०० सुरक्षा रक्षकांना कमी करण्यात आले. त्यानंतर आता स्मार्ट संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. सुरक्षा रक्षक कामावर येतच नव्हते, गरज नसताना त्यांची नियुक्ती करण्यात आली होती असे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्मार्ट संस्थेचे कर्मचारी असल्यामुळे संगणक येत असूनही महापालिकेचे कायम कर्मचारी काम करीत नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे.त्यामुळे मनसेच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. गटनेते वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह स्मार्ट संस्थेच्या कामावरून कमी केलेल्या सेविका उपस्थित होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणेMNSमनसे