शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊस जाळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 07:04 PM2019-03-02T19:04:01+5:302019-03-02T19:04:58+5:30

पुणे  : नगर कल्याण महामार्गावर बनकर फाटा येथील डिंगोरे (ता.जुन्नर) गावातील शेतकरी शाम नारायण बनकर यांचे यांच्या शेतात शॉर्ट ...

Due to the short circuit, three acres of sugarcane burn | शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊस जाळून खाक 

शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊस जाळून खाक 

Next

पुणे  : नगर कल्याण महामार्गावर बनकर फाटा येथील डिंगोरे (ता.जुन्नर) गावातील शेतकरी शाम नारायण बनकर यांचे यांच्या शेतात शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. त्यामध्ये  तीन एकर ऊस  जळून खाक झाला.  ही घटना गुरुवारी सायंकाली साडेचारच्या सुमारास घडली. 

               याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शाम बनकर यांच्या शेतामध्ये माहवितरणच्या तारांचे खांब आहेत. त्यावरून उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. खांबाजवळ या विद्युत वाहिन्यांच्या एकमेकांशी संपर्क आल्याने त्यातून ठिणग्या उडाल्या. त्या ऊसावर पडल्या. दिवसभर कडक उन्हामुळे तापलेले ऊसाच्या पिकांनी यामुले लगेच पेट घेतला आणि पाहता-पाहता अवघा तीन एकरच्या ऊसाची राख झाली. त्यामुळे सुमारे साडेसात लाखांचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर  अनाजी शिंदे, अमोल बनकर अमित बनकर, विकास बनकर आदींंनी आग विझविण्याचे प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले.विजवितरणाच्या भोंगळ कारभारामुळेच ही आग लागली असल्याने विजवितरणाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शाम बनरकर यांनी केली आहे. दरम्यान तलाठी आर. डी. अडसरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Due to the short circuit, three acres of sugarcane burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.