शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रोडरोमिओंमुळे तळेघर ग्रामस्थ त्रस्त, निर्भया पथकाची स्थापना करा - पालकांची पोलिसांकडे मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:29 AM

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंच्या त्रासामुळे महाविद्यालयीत तरूणी त्रस्त झाल्या आहेत. या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थीनींनी केली आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंच्या त्रासामुळे महाविद्यालयीत तरूणी त्रस्त झाल्या आहेत. या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थीनींनी केली आहे.आदिवासी मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत प्रश्न कायमचा मिटावा म्हणून गेले पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर या संस्थेच्या वतीने येथे शिवशंकर महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयामध्ये प्रथमत: पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग सुरू होते. यानंतर या विद्यालयाचा विस्तार होवून गेले आठ ते दहा वर्षांपासून विना अनुदानित तत्त्वावर कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. आदिवासी भागातील डोंगर दºयाखोºयांमधील मुले-मुली या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. भीमाशंकर आहुपे व पाटण त्याचप्रमाणे खेड तालुक्याच्या हद्दीतील ही मुले-मुली या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्याच प्रमाणे जिल्हापरिषदेची पहिली ते सातवी पर्यंतचीशाळा या गावामध्ये आहे.परंतु अलीकडे मोठ्या प्रमाणात या गावामध्ये रोडरोमिओंचा उपद्रव वाढला असून आदिवासी भागातील महाविद्यालयीन मुलींना याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेत तात्काळ या रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.गावामध्ये असणारे हनुमान मंदिर या परिसराच्या कट्टयार, जांभोरी फाटा चौकात, जाभोरी रोड, महाविद्यालयीन परिसर, जुने वसतीगृह परिसर या भागांमध्ये बिनधास्तपणे फिरत असतात. काही तरुण दुचाकीवर चौबलसिट, रस्त्यावर वेगाने दुचाकी चालवणे, मोठ्याने ओरडणे, गाणी म्हणणे, शिट्टी वाजवणे, ग्रुपने महाविद्यालयीन गणवेश व्यतिरिक्त टीशर्ट परिधान करून शर्टच्या मागील बाजूस खूनसी काव्यपंक्ती टाकत शेरेबाजी मारणे, महाविद्यालयाच्या खालच्या बाजूस असणाºया पुलावरती बसून मुलींकडे पाहणे, महाविद्यालय परिसर व गावातील हनुमान मंदिर परिसरामध्ये घोळक्याने बसून मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्येच टोळ्या टोळ्या करून मुलींची छेडछाड केली जात असून यातूनच टोळी युद्धांना पेव फुटत आहे.याबाबत पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलून दामिनी पथक, निर्भया पथकांची स्थापना करावी. त्याचप्रमाणे महाविद्यालय व परिसरामध्ये तक्रार पेट्या बसवण्यात याव्यात. या रोडरोमिओंचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.दोन दिवसांपूर्वी या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये महाविद्यालया बाहेरील तरुणांनी येवून सलग धिंगाणा घातला. परंतु महाविद्यालयीन प्रशासनाने याबाबत कुढलीही कारवाई केली नाही. तळेघर हे गाव तालुक्याच्या आदिवासी भागात असून या गावापासून ३५ ते ४० कि . मी. अंतरावरती घोडेगाव पोलीसठाणे आहे. या महाविद्यालयीन युवती तक्रार करणार तरी कोणाकडे? एखादी गंभीर बाब घडल्यानंतर पोलीस जागे होणार का, असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. विशेषत: या ठिकाणी बसस्थानक नसल्याने ठिकठिकाणांवरून बसने येणाºया मुली या हनुमान मंदिरासमोर थांबतात. या ठिकाणी हे रोडरोमिओ फिरत असतात. तसेच त्यांची छेड काढत असतात. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेSchoolशाळा