शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला पाणी सोडल्याने ‘उजनी’त घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:53 IST

उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते

भिगवण : उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीसाठा मृत साठ्यात गेला आहे. परिणामी शेतकरीवर्गासह नदीकाठावरच्या गावांवरील पाणी संकट गडद झाले आहे. मंगळवारी (दि. २) सकाळी धरणाची पाणीपतळी वजा २२.४२ टक्के एवढी झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली.

उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते. यंदा प्रथमच उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये गेला आहे. कारण दर वर्षी उजनी धरण १ मेच्या आसपास उणे होते. मागील वर्षी २३ मेपर्यंत उजनी अधिकमध्ये होते. मात्र, या वर्षी दोन ते अडीच महिने अगोदरचउपयुक्त पाणी संपले आहे. यामुळेऐन दुष्काळात तेरावा महिना उजाडण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.नदीद्वारे पाणी न सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी....सोलापूर शहराला पाणी पाईपलाईनद्वारे नेणे गरजेचे आहे. मात्र, उजनीतून ते पाणी नदीद्वारे सोडले जात असल्याने या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातून उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात मोठी घट होते. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली राजकारण्यांच्या शेतीसाठी या पाण्याचा वापर होत आहे. नदीद्वारे पाणी सोडू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी वेळोवेळी केली आहे.सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता खाली पाणी सोडल्याने उजनी जलाशयावरील जवळजवळ सर्वच पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसणार आहे. सोलापूरला पिण्यासाठी पाणी पाहिजे; परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना त्यामुळे बंद पडणार आहेत त्याचे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.उजनीच्या पाण्याचा विचार करता, प्रथम मूळ धरणग्रस्त, उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांचा विचार केला जात नाही. धरण निर्मितीपासून पाणी नियोजनासाठी उजनी धरण प्राधिकरण मंडळाची निर्मितीची मागणी धूळ खातच पडली आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने मतांच्या जोगव्यासाठी भाजप सरकारने पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने निवडणुकीच्या प्रचारात उजनीचा पाणीप्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. सोडलेल्या पाण्यावर मते मिळणार असली तरी दुष्काळाची दाहकता नक्कीच वाढेल.

टॅग्स :DamधरणPuneपुणे