शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने ‘उजनी’ त घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:05 IST

उजनी धरण हे राज्यातील सर्वात मोठ्या  धरणांपैकी एक धरण आहे.

ठळक मुद्देनदीकाठावरच्या गावांवरील पाणी संकट गडद : धरणाची पाणीपातळी वजा २२.४२ टक्के धरण निर्मितीपासून पाणी नियोजनासाठी उजनी धरण प्राधिकरण मंडळाची निर्मितीची मागणी धुळखातच

भिगवण  :उजनी धरणातूनसोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होवून पाणीसाठा मृत साठ्यात गेला आहे. परीणामी शेतकरी वर्गासह नदीकाठावरच्या गावांवरील पाणी संकट गडद झाले आहे. मंगळवारी (दि २) सकाळी धरणाची पाणीपतळी वजा २२.४२ टक्के एवढी झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.उजनी धरण हे राज्यातील सर्वात मोठ्या  धरणांपैकी एक धरण आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणापेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृतसाठ्याबाबत राज्यातील सर्वात मोठे धरण म्हणून गणले जाते. यंदा प्रथमच उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये गेला आहे. कारण दरवर्षी उजनी धरण एक मे च्या आसपास मायनस मध्ये येते. मागील वर्षी २३ मे पर्यंत उजनी अधिक मध्ये होते. मात्र ,यावर्षी दोन ते अडीच महिने अगोदरच उपयुक्त पाणी संपला आहे. यामुळे ऐन दुष्काळात तेरावा महिना उजाडण्याची भीती शेतकरी व्यक्त करु लागले आहेत.सोलापूरला शहराला पाणी पाइपलाइनद्वारे नेणे गरजेचे आहे.मात्र, उजनीतन ते  पाणी नदीद्वारे सोडले जात असल्याने या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातुन उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात मोठी घट होते. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली राजकारण्यांच्या शेतीसाठी या पाण्याचा वापर होत आहे. नदीद्वारे पाणी सोडू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी वेळोवेळी केली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता खाली पाणी सोडल्याने उजनी जलाशयावरील जवळजवळ सर्वच पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसणार आहे. सोलापूरला पिण्यासाठी पाणी पाहिजे, परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना यामुळे बंद पडणार आहेत त्याचे काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. उजनीच्या पाण्याचा विचार करताना, प्रथम मूळ धरणग्रस्त, उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांचा विचार केला जात नाही .धरण निर्मितीपासून पाणी नियोजनासाठी उजनी धरण प्राधिकरण मंडळाची निर्मितीची मागणी धुळखातच पडली आहे. सध्या निवडणूकीची धामधूम सुरू असल्याने मतांच्या जोगव्यासाठी भाजप सरकारने  पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने निवडणूकीच्या प्रचारात उजनीचा पाणीप्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. सोडलेल्या पाण्यावर मते मिळणार असली दुष्काळाची दाहकता नक्कीच वाढणार आहे.

टॅग्स :Ujine Damउजनी धरणSolapurसोलापूरWaterपाणीGovernmentसरकारFarmerशेतकरी