शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

थंडी वाढल्याने पिंपरीत वाढले अपघात

By admin | Updated: December 22, 2014 05:23 IST

शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी

पिंपरी : शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी प्रवासाला जाताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दहा दिवसांत पहाटे आणि सकाळच्या वेळेतच अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी तर एकाच दिवसात अपघाताच्या चार घटना घडल्या. पैकी तीन अपघात सकाळी साडेसहा ते आठच्या सुमारास घडले. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक हैराण आहेत. अपघाताची कारणे वेगवेगळी असली, तरी बहुतेक अपघात वाढत्या थंडीमुळेही घडत आहेत. अनेकजण कामानिमित्त सकाळी लवकरच घराबाहेर पडतात. व्यावसायिकांसह नोकरदार सकाळीच घरातून निघतात. मात्र, वाहनाने जाताना हवी तितकी काळजी घेतली जात नाही. यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत. वाढत्या थंडीमुळे वातावरणात दाट धुके निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनाच्या समोरच्या काचेवर दव जमा होतात. प्रवासादरम्यान समोरचे स्पष्ट दिसत नाही. रस्ताही लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठी वाहनाचा वेग कमी असावा, वायपर सुस्थितीत असावेत, तसेच लाईट सुरू ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून समोरील वाहनास अंदाज येऊ शकतो. वेग कमी असताना वाहनाचे चाक खड्ड्यात गेल्यास अथवा रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाल्यास जीवितास धोका निर्माण होत नाही. थंडीत दुचाकीवर प्रवासाला जाताना हेल्मेटसह स्वेटर, हातमोजे, बूट घालणे आवश्यक आहे. हेल्मेटविना दुचाकी चालविल्यास थंड हवा नाका-तोंडात गेल्याने डोके दुखून दुचाकीवरील नियंत्रण सुटू शकते. हातमोजे वापरणेही गरजेचे आहे. ही साधी गोष्ट अपघातास निमंत्रण देणारी ठरू शकते. दुचाकीचे नियंत्रण बहुतांश हँडलवरच असते. त्यासाठी बोटांचा उपयोग होतो. क्लच, बे्रक दाबणे या प्रक्रियांवर परिणाम होऊन दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडू शकतो. (प्रतिनिधी)