पुणे महापालिकेच्या विविध विभागांचे पुरामुळे ५० कोटींच्या पुढे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 07:00 AM2019-11-21T07:00:00+5:302019-11-21T07:00:09+5:30

शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांनाही पुराचा तडाखा

Due to heavy rains of various sections of Pune Municipal Corporation, the loss was further beyond Rs. 3 crores | पुणे महापालिकेच्या विविध विभागांचे पुरामुळे ५० कोटींच्या पुढे नुकसान

पुणे महापालिकेच्या विविध विभागांचे पुरामुळे ५० कोटींच्या पुढे नुकसान

Next
ठळक मुद्देपथ, मल:निस्सारण, विद्यूत, उद्यान, पाणी पुरवठा, भवन आदी विभागांचे ५० कोटींपेक्षा अधिक नुकसानलोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये पाणी शिरल्याने वातानुकुलीत यंत्रणा बंद

पुणे : शहरात अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे जसे खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच महापालिकेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पथ, मल:निस्सारण, विद्यूत, उद्यान, पाणी पुरवठा, भवन आदी विभागांचे ५० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दुरुस्ती करण्यासाठी या सर्व विभागांकडून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून नुकसानीची एकत्रित माहिती गोळा करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरुवात केली आहे. 
पुरामुळे शहरातील नाल्यांवर आणि मोठ्या ओढ्यांवर असलेले कलव्हर्ट वाहून गेले होते. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून रस्त्यांचे नुकसानही झाले आहे. यासोबतच, जवळपास सहा किलोमीटरच्या मल:निस्सारण वाहिन्या खराब झाल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या जलवाहिन्या आणि पंपांचेही मोठे नुकसान झाले आहे. पद्मावती पंपिंग स्टेशनमध्येही मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे येथील विद्यूत व्यवस्थाही नादुरुस्त झाली होती. 
यासोबतच उद्यान विभागाच्या अखत्यारीतील कात्रज प्राणी संग्रहालयाची सीमाभिंत पडली होती. या भिंतीचा खर्च दोन कोटींपेक्षा अधिक होणार आहे. यासोबतच नाला उद्याने आणि अन्य उद्यानांचेही पुरामध्ये नुकसान झाले आहे. झाडे, उद्यानांमधील वस्तू, खेळणी पुरामध्ये वाहून गेली. यासोबतच पालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या सीमाभिंती पडल्या. इमारतींचे नुकसान झाले. स्मशानभूमी, दफनभूमींसह सार्वजनिक इमारतींना पुराचा फटका बसला. अनेक ठिकाणी पुराच्या तडाख्यात विद्यूत खांब उन्मळून पडले. केबल्सचे नुकसान झाले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये पाणी शिरल्याने वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. ती अद्यापही सुरु झालेली नाही. यासोबतच पंखेही बंद पडले होते. विद्यूत विभागाने हे पंखे सुरु केले. परंतू, एसीच्या दुरुस्तीला मोठा खर्च येणार असल्याने त्याचे काम रखडले आहे. 
यासोबतच शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांनाही पुराचा तडाखा बसला होता. याभागातील पालिकेची उद्याने, शाळा, व्यायामशाळा, मल:निस्सारण आणि जलवाहिन्यांनाही त्याचा फटका बसला आहे. पालिकेच्या या सर्व विभागांनी आपले झालेले नुकसान आणि त्याच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्च याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ही माहिती आपत्कालीन विभागाकडून एकत्रित करण्यात येत असून ही माहिती अतिरीक्त आयुक्तांना सादर केली जाणार आहे. 
====
 पुराच्या घटनेला दोन महिने होत आले तरी प्रशासनाने अद्यापही सर्व विभागांच्या नुकसानीचा एकत्रित आकडा काढलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून अतिरीक्त आयुक्तांच्या आदेशानंतर हा आकडा एकत्रित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
====
विभाग                                   दुरुस्तीसाठी येणारा अंदाजे खर्च
पथ                                             १५ ते २० कोटी
मल:निस्सारण                            ७ कोटी
विद्यूत विभाग                            २ कोटी
उद्यान विभाग                             ५ कोटी
पाणी पुरवठा                            दीड ते दोन कोटी
भवन विभाग                          ७ कोटी २० लाख

Web Title: Due to heavy rains of various sections of Pune Municipal Corporation, the loss was further beyond Rs. 3 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.