शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 9:40 PM

यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.

पुणे : यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.त्यांच्या या हट्टापायी अधिवेशानाचा पहिला आठवडा पाण्यात गेला आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. अधिवेशन परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्या हे काय चाललय असा सवालही त्यांनी केला. शेतकरी वर्गाला दीडपट हमी भाव जाहीर करणे म्हणजे मध्य निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी अजित पवार म्हणाले की,नागपूर येथील अधिवेशन मुहूर्त पाहून सोमवार ऐवजी बुधवारपासून अधिवेशन सुरु केले आहे.आपण कुठल्या काळात आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.  ते पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये नालेसफाई झाली नसल्याने ही अवस्था ओढवली.नागपूरपासून दिल्ली पर्यंत भाजपचेच सरकार आहे. तरीदेखील तिथे पाणी तुंबले आहे.याला जबाबदार कोण आहे.असा सवाल देखील उपस्थित केला.ज्या नागपूराचे केंद्रीयमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ही अवस्था एका पावसाने केली.तर राज्यातील सर्व सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा खरपूस समाचार देखील त्यांनी घेतला.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे -

  • कालचा दिवस सिडको व्यवहाराच्या गोंधळात गेला, काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वेगळं सांगितलं, आज जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सिडकोची हजारो कोटींची जमीन  जमीन मातीमोल भावात देण्यात आली. 
  • पाणी साचल्यानंतर आज ड्रेनेज साफ  करताना दारूच्या बाटल्या सापडल्या, हे दुर्दैवी आहे. आज संपूर्ण नागपूर जलमय झालं आहे. 
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चुनावी जुमले पुन्हा सुरू झाले आहेत, हमीभावाच दिडपड देऊ सांगितलं जातं पण यातही घोळ आहे. 
  • शिवसेनेचे आमदारही नाराजी व्यक्त करत म्हणले हे मुंबईत झालं असतं तर आमच्यावर टिकेची झोड उठली असती, पण मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने काही शब्द नाही.
  • कामकाजावर केला जाणार लाखोंचा खर्च वाया जात आहे, ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करावी.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८