शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुण्यात 'या' चार दिवशी असणार 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 6:56 PM

चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश

ठळक मुद्दे२९ आणि ३० नोव्हेंबर तसेच १ आणि ३ डिसेंबरला मद्यविक्री बंद असणार

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या रविवारपासून (२९ नोव्हेंबर) चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दिले आहेत. त्यानुसार २९ आणि ३० नोव्हेंबर तसेच १ आणि ३ डिसेंबरला मद्यविक्री बंद असणार आहे. 

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुका असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. मतदान दिवसाच्या 48 तास अगोदर मद्यविक्री आणि मद्यालये बंद ठाण्यांच्या हद्दीमधील दुकाने आणि मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार २९ नोव्हेंबरला सायंकाळी पाचनंतर मद्यविक्री दुकाने आणि मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. ३० नोव्हेंबर हा मतदानाच्या अगोदरचा दिवस असल्याने संपूर्ण दिवस मद्यविक्री व दुकाने आणि मद्यालये बंद असणार आहेत.१ डिसेंबरला मतदान असून मतदानाची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. मतदान संपल्यानंतर दुकाने आणि मद्यालये उघडली जाणार आहेत. २ डिसेंबरला निवडणुकीविषयी कोणतेही कामकाज नसल्याने या दिवशी दुकाने आणि मद्यालये खुली राहणार आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी असून, मतमोजणी असलेल्या पोलीस ठाण्यात मद्य विक्री बंद ठेवण्यात येणार आहेत.  

याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक संतोष झगडे, निवडणूक आयोगाच्या सूचना आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या चार दिवस दिलेल्या वेळांमध्ये मद्य विक्रीची दुकाने आणि मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे पालन होण्यासाठी संबंधित विभागाच्या निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूकliquor banदारूबंदी