शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

खोर परिसरातील बंधारे पडले कोरडे ठणठणीत

By admin | Updated: July 13, 2015 04:12 IST

खोर (ता. दौंड) परिसरामधील सर्वच ठिकाणचे ओढे, नाले, तलाव हे ऐन पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कोरडे ठाण पडले आहेत

खोर : खोर (ता. दौंड) परिसरामधील सर्वच ठिकाणचे ओढे, नाले, तलाव हे ऐन पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कोरडे ठाण पडले आहेत.खोर परिसराला दुष्काळाच्या कालावधीत वरदान ठरत असलेला डोंबेवाडी पाझर तलावात केवळ एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा उरलेला असून, तोही महिन्याच्या आत पाऊस जर झाला नाही तर तोही कोरडा पडला जाणार असल्याने ऐन पावसाळ्याचा कालावधी असूनदेखील या भागाला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. जून प्रारंभ होताच पावसाने तुरळक हजेरी लावली होती. काही ठिकाणच्या परिसरात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या; मात्र तुरळक पावसाने विहिरींना पाणी आलेच नसल्याने बऱ्याच ठिकाणच्या परिसरामधील विहिरी अजूनही कोरड्याठाक आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप पिकाचा हंगाम वाया जातो की काय, या संभ्रमात शेतकरी वर्ग पडला गेला आहे. आकाशात जमणारे काळेकुट्ट ढग, उष्णतेमुळे तापमानात झालेली वाढ असे पावसासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती होऊनदेखील पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. आगामी काळतही पावसाची अशीच परिस्थिती राहिली गेली तर खोर परिसराबरोबरच देऊळगावगाडा, माळवाडी, नारायणबेट, पडवी, कुसेगाव या भागांमधील गावांची पाण्याची परिस्थिती भीषण होऊन शेतकरी वर्ग आणखीच अडचणीत सापडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. पाण्याची कमतरता भासू लागल्याने शेतकऱ्यांनी बोअरवेल जमिनीमध्ये घेतले; मात्र पाण्याची पातळीच खालावली गेली असल्याने बोअरवेललादेखील पाणी लागत नसल्याचे या भागामधील एकंदरीत चित्र आहे. दरवर्षी या कालावधीमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडून विहिरी, तलाव, नाले, गावबंधारे यांना मुबलक पाणीसाठा असतो, मात्र यावर्षी पावसाने चांगलीच पाठ फिरवली असल्याने शेतीच्या पाण्याची समस्या आणखीच बिकट होण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)