Pune | दारूच्या नशेत महिलेचा हॉटेलमध्ये राडा; भाकरी न मिळाल्याने ओतले इतरांच्या ताटात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 09:10 IST2023-04-24T09:06:48+5:302023-04-24T09:10:02+5:30
याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी वानवडी येथील केदारीनगरमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या महिलेला अटक केली आहे...

Pune | दारूच्या नशेत महिलेचा हॉटेलमध्ये राडा; भाकरी न मिळाल्याने ओतले इतरांच्या ताटात पाणी
पुणे : हॉटेलमध्ये जेवायला भाकरी न मिळाल्याने दारूच्या नशेत कामगारांना शिवीगाळ करून लोकांच्या जेवणात पाणी टाकण्याचा प्रताप एका महिलेने केला. पोलिस आले असताना महिला पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्या हाताचा अंगठा पिरगाळून चावा घेतला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी वानवडी येथील केदारीनगरमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या महिलेला अटक केली आहे.
याप्रकरणी महिला पोलिस नाईक वनिता माने यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मार्केट यार्डमधील श्री सागर हॉटेल व मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, श्री सागर हॉटेल येथे आरोपी महिला जेवण करण्यासाठी गेली होती. तेथे जेवणात भाकरी न मिळाल्याने दारूच्या नशेत तिने हॉटेलमधील कामगार व मॅनेजर यांना शिवीगाळ केली. हॉटेलमधील इतर लोकांच्या जेवणात पाणी टाकले. ही बाब हॉटेल मॅनेजर याने पोलिसांना कळविली. पोलिस हॉटेलमध्ये गेले. तीन महिला पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी तिला अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.