पत्नीला घरातून हाकलून दिल्याच्या कारणावरुन मद्यपी मुलाची आईला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 19:21 IST2018-07-24T19:20:19+5:302018-07-24T19:21:17+5:30

मद्यपी मुलाने आपल्या आईने पत्नीस घरातून हाकलून दिले, या कारणावरून शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याची घटना घडली. 

drunken boy was beaten to mother due to family matter | पत्नीला घरातून हाकलून दिल्याच्या कारणावरुन मद्यपी मुलाची आईला मारहाण

पत्नीला घरातून हाकलून दिल्याच्या कारणावरुन मद्यपी मुलाची आईला मारहाण

लोणी काळभोर : मद्यपी मुलाने आपल्या आईने पत्नीस घरातून हाकलून दिले, या कारणावरून आईला शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याची घटना घडली. यात आईचा हात फॅक्चर असल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली. 
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार सोमवारी  ( २३ जुलै) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी सिंधू गोपीचंद दरेकर ( वय ४५, रा. बालाजी हाईटस, कदमवाकवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा अभिजीत गोपीचंद दरेकर (वय २७) यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सिंधू दरेकर या घरी असताना अभिजीत मद्य प्राशन करून घरी आला. त्याने माझ्या बायकोला घरातून का हाकलून दिले, असे विचारत आईला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात आईचे करंगळी व त्या शेजारील बोट फ्रॅक्चर झाले. आर्ईने मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.   

Web Title: drunken boy was beaten to mother due to family matter