मद्यपीची गळफास घेऊन आत्महत्या, बारामती तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 16:59 IST2023-11-30T16:54:46+5:302023-11-30T16:59:07+5:30
माळेगाव ( पुणे ) : येथील राजेश प्रभाकर जावळे याने राहत्या घरी बुधवारी (दि. २९) गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

मद्यपीची गळफास घेऊन आत्महत्या, बारामती तालुक्यातील घटना
माळेगाव (पुणे) : येथील राजेश प्रभाकर जावळे याने राहत्या घरी बुधवारी (दि. २९) गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत लीला प्रभाकर जावळे (रा. लोणकरवस्ती, माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांनी पोलिसांना माहिती दिली.
लीला जावळे या लग्नाच्या कामानिमित्त बारामती येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा राजेश हा घरीच होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्या सायंकाळी पाच वाजता घरी आल्या. यावेळी घराचे पुढील व पाठीमागील दरवाजे बंद होते. त्यांनी राजेशला हाक मारली. मात्र, त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही. यानंतर त्यांना घराच्या पाठीमागील दरवाजाकडे जाताना खिडकी उघडी दिसली. यावेळी मुलगा राजेश याने खिडकीला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.
लोकांच्या मदतीने घराचा बंद दरवाजा तोडून त्या घरात गेल्या. यावेळी मुलगा राजेश याने देवघरातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेचा तपास पोलिस नाईक अमर थोरात करीत आहेत.