Pune News | तलवार उगारून दहशत माजविणारा मद्यधुंद पोलिस निलंबित; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 10:15 IST2023-04-26T10:14:05+5:302023-04-26T10:15:02+5:30
विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune News | तलवार उगारून दहशत माजविणारा मद्यधुंद पोलिस निलंबित; गुन्हा दाखल
पुणे : मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात तलवार उगारून दहशत माजविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी हा आदेश काढला आहे. विजय लक्ष्मण जाधव असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय जाधव हा मुंढवा वाहतूक शाखेत नियुक्तीला होता. धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील पथकाला मिळाली. पोलिसांनी तिथे जाऊन जाधव याला पकडले. चौकशीत तो वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी असल्याचे आढळून आले.
जाधव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.