शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police: पुण्यासह इतर राज्यातील तब्बल ५ हजार कोटींचे ड्रग्स जप्त; पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:45 IST

राज्याबाहेर जात ड्रग्सची पाळेमुळे खणून काढत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला

किरण शिंदे

पुणे: पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त आणि त्यांच्या टीमला राज्य सरकारकडून २५ लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आले. अमोल झेंडे आणि त्यांच्या पथकाने ड्रग्ज प्रकरणात धडाकेबाज कारवाई केली होती. गुन्हे शाखेच्या तत्कालीन टीमने तेव्हा पुण्यासह दौंडजवळील कुरकुंभ, सांगली जिल्ह्यातील कुपवाड, दिल्ली, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल येथे कारवाई करत तब्बल ५ हजार कोटींहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. 

ड्रग्स कारवाईला सुरुवात झाली ती ललित पाटील प्रकरणापासून. ड्रग तस्कर ललित पाटील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना तो उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने रुग्णालयातूनच ड्रग्स रॅकेट चालवले होते. तत्कालीन डीसीपी अमोल झेंडे आणि त्यांच्या पथकाने ससून रुग्णालय परिसरात छापेमारी करत हे ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलं होतं.यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्यापूर्वीच ललित पाटील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या मदतीने पळाला होता. या प्रकरणाची तेव्हा देशभरात चर्चा झाली होती. 

दरम्यान ड्रग्स माफिया पळून गेल्याने पुणे पोलिसांवर टीकेचा भडीमार होऊ लागला होता. तेव्हा गुन्हे शाखेचे तत्कालीन डीसीपी अमोल झेंडे आणि त्यांच्या पथकाने अनेक शहरात राज्याबाहेर जात ड्रग्सची पाळेमुळे खणून काढली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेव्हा दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला होता. 

गुन्हे शाखेच्या याच कामगिरीची दखल आता राज्य शासनाने घेतली आहे. ही कामगिरी करणाऱ्या गुण शाखेच्या पथकाला शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा निधी पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त यांना वितरीत करावा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईबाबत कामगिरची नोंद घेऊन ही रक्कम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थMONEYपैसाMaharashtraमहाराष्ट्र