Pune Crime | "दुबईहून आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले..." महिलेला तब्बल ९१ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 14:35 IST2023-04-06T14:33:27+5:302023-04-06T14:35:11+5:30
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...

Pune Crime | "दुबईहून आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले..." महिलेला तब्बल ९१ लाखांना गंडा
पुणे : मी मुंबई सायबर क्राईममधून बोलत आहे. दुबईहून आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे, असे सांगून एका महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल ९१ लाखांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती हे व्यावसायिक होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण फेडेक्स कुरियनमधून बोलत असून तुमच्या नावाने दुबईहून एक पार्सल आले आहे. त्यात ८०० ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. पोलिस तुम्हाला पकडतील. असे सांगून त्यांना अंधेरी येथील सायबर पोलिस अधिकारी अजयकुमार बन्सल याच्याशी संपर्क साधायला सांगितला.
त्यांनी त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने आम्ही चौकशी करत असून, या प्रकरणात तुमचे बँक खाते सील केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यावरील पैसे तुम्ही दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करा, चौकशी पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतील, असे सांगून त्यांना ३ बँक खाते क्रमांक पाठविले. फिर्यादी महिलेने घाबरून आपल्या खात्यातील २० लाख रुपये त्या खात्यांवर ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांच्याकडील ८० लाख रुपयांची मुदत ठेवी मोडायला लावून ते पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडले.