शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलजवळील 'ते' सहा मोबाइल काेणाच्या खिशात? सीसीटीव्हीचे गुपित उलगडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 14:41 IST

ललित पाटीलकडून दोन मोबाइल जप्त केल्याची नोंद पोलिसांकडे असेल, तर ‘ससून’मधील कर्मचाऱ्यांनी पाहिलेले ते ६ मोबाइल काेणाच्या खिशात गेले

दुर्गेश मोरे 

पुणे : ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, तपासादरम्यान, ललित पाटील याने मुंबई पोलिसांना आपल्याला पळून जाण्यास सांगितले होते, असा खुलासा केला होता, त्या अनुषंगाने छोट्याछोट्या गोष्टींचा तपास होणे गरजेचे असल्याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. ललित पाटीलकडून दोन मोबाइल जप्त केल्याची नोंद पोलिसांकडे असेल, तर ‘ससून’मधील कर्मचाऱ्यांनी पाहिलेले ते ६ मोबाइल काेणाच्या खिशात गेले, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. जून २०२३ पासून ललित पाटील ससून रुग्णालयातील वॉर्ड क्र. १६ मध्ये उपचार घेत होता. या वॉर्डमध्ये ललितच नाही तर अनिल भोसले, प्रदीप शर्मा असे सहा-सात व्हीआयपी लोक होते. कोर्ट कंपनी नियमानुसार प्रत्येक आरोपीसाठी स्वतंत्र गार्डची नेमणूक करण्यात येते. ललितसाठी एक पोलिस उपनिरीक्षक आणि चार कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

ललित पाटील पळून गेल्यानंतर कर्तव्यात कसून करणाऱ्या त्याच्याशी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले; पण त्या वॉर्डमध्ये अन्य काही व्हीआयपी लोकांना तत्पूर्वीच हलवले होते. त्यांच्याकडे चाैकशी केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ललितकडून दोन मोबाइल जप्त केल्याची पोलिसांकडे नोंद आहे.

वास्तविक, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मते ललितकडे सहा मोबाइल होते. जर सहा मोबाइल असतील तर ते कोणाच्या खिशात गेले, त्या अनुषंगाने तपास झाला किंवा नाही, तसेच ते मोबाइल कोणाचे होते, ते कुणी पुरविले, त्यामधील सीम कोणाच्या नावाने होते, त्यावरून तो कोणाशी संपर्क साधत होता, तसेच त्या वॉर्डमध्ये असणाऱ्या अन्य लोकांकडे मोबाइल होते का, त्यावरून ललितने कोणाला फोन केले का, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही वळवण्यात आले होते. ते कोणी वळवले हे आजपर्यंत समोर आले नाही. ते कधी वळवले होते. हेही माहीत नाही. सीसीटीव्ही वळवणारी व्यक्ती निश्चितच त्यामध्ये आली असणार तिचाही शोध लागलेला नाही. सीसीटीव्ही बंद करून वळवले असतील तर त्या चित्रण संपादित केल्या जाणाऱ्या ठिकाणी कोणाची ड्यूटी होती, हेही पाहणे गरजेचे आहे. ललित पाटील पळून जाणार त्याचवेळी विद्युत पुरवठा बंद होणे हा निव्वळ योगायोग आहे की अन्य काय, हे देखील स्पष्ट झाले नाही. एकूणच जे प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरे सापडत नसल्याने हे प्रकरण दिसते तसे नसल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

आता उपचाराची गरज नाही का ?

पिंपरी-चिंचवड येथे २०२० मध्ये पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात त्याचा मुक्काम होता. त्यानंतर जून २०२३ मध्ये टीबी, हर्निया अन्य आजारावर उपचार करण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ ऑक्टोबर २०२३ ला ललितला पळायला लावले अथवा पळून गेला, त्यानंतर त्याला १८ ऑक्टोबरला बंगळुरू येथे मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आणि ३१ ऑक्टोबरला पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतला. त्यानंतर आज अखेरपर्यंत ललितला असणाऱ्या आजारावर उपचार करण्याची गरज भासली नाही. म्हणजे उपचाराचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर काय कारवाई झाली.  तो सल्ला देण्यामागे पडद्याआडचा सूत्रधार कोण या प्रश्नाचे उत्तरही गुलदस्त्यातच आहे. 

टॅग्स :PuneपुणेLalit Patilललित पाटीलsasoon hospitalससून हॉस्पिटलdoctorडॉक्टरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ