शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेलमधून सर्रास ड्रग्स विक्री; अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 17:39 IST

पुण्यातील प्रमुख अशा फर्ग्युसन रस्त्यावरील नामांकित हॉटेलमधून अल्पवयीन मुलांना ड्रग्सबरोबर दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पुणे: पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे दिसतंय. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.  पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब, हॉटेल आणि बारवर पोलीस कारवाई सुरु झाली होती. हॉटेल्सला अल्पवयीन मुलांना दारू देण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच दारूच्या दुकानातूनही २१ वर्षांखालील मुलांना दारूविक्री केली जात नव्हती. मात्र आता सरार्सपणे मुलांना ड्रग्स दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे पोलीस प्रशासन नक्की काय करतंय असा सवाल उपस्थित होतोय. 

पुणे मध्यंतरी ड्रग्सचे हबच बनले होते. शहरासह उपनगरात ड्रुग्स विक्री करणारे आढळून आले होते. पोलिसांच्या कारवाईत कोट्यवधींचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी तर प्रत्येकी पोलीस ठाण्याला ड्रग्स संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आता फर्ग्युसन रस्त्यावरील प्रकरणानंतर पोलीस कारवाई थंड झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. या प्रमुख रस्त्यावरील हॉटेलमधून अशा प्रकारे सर्रास विक्री होत असल्याने पोलीस काय कारवाई करतील. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.   

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेलMONEYपैसा