शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने मारले आणि पाटबंधारेने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 02:25 IST

नीरा डाव्या कालव्यावरील ५७ नंबर वितरिकेतून आवर्तन

रेडणी : यंदा भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांना पिकांना मारले असताना पाटबंधारे विभागाच्या विभागाच्या अधिकाºयांनी केलेले काटेकोर नियोजन व पाणीचोरांवर ठेवलेला वचक यामुळे नीरा डाव्या कालव्याच्या ५७ व्या वितरिकेतून आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे माना टाकलेल्या पिकांना जिवदान मिळणार असून पीके तारली जाणार आहेत.या आवर्तनामुळे बोराटवाडी, खोरोची, रेडणी, माने वस्ती (निरवांगी) येथील शेतºयांना फायदा मिळत आहे. दुष्काळाचे गांभीर्य ओळखून आत्तापर्यंत सुरू असलेली पाणीचोरी रोखून वेगात सिंचन सुरू असल्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहेत. यापूर्वी नीरा डावा कालव्याचे आवर्तन नेहमीच वादात राहिले आहे. मागील वर्षी धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा होता तरी देखील शेतकºयांना पाणी वेळेवर मिळाले नाही म्हणून पिके जळाली होती. पाणी चोरांमुळे जवळजवळ पन्नास टक्के पाणी चोरी जाऊन आवर्तन लांबत होते. आवर्तन लांबल्याने हेड व टेलच्या शेतकºयांमध्ये वादही निर्माण झाले होते, परंतु चालू आवर्तनामध्ये मात्र सायफन विरोधात पाटबंधारे विभागाने कंबर कसली आहे. आतापर्यंत सायफनमाफिया तुपाशी व सर्वसामान्य शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असायची, यावेळी मात्र सायफनधारकांवर जरब बसवण्यात पाटबंधारे विभाग यशस्वी ठरला आहे. चालू आवर्तनात वितरिका क्रमांक ५७ वरील दारे क्रमांक १९( बोराटवाडी) व दारे क्र. १८ (खोरोची) दोन्हीकडे पाणी पूर्ण क्षमतेने चालू होते.पाणीचोरी रोखून नीरा डावा कालव्याचे आवर्तन समाधानकारक वेगाने सुरू असल्याचे श्रेय पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन व महावितरणचे कर्मचारी यांना संयुक्तपणे द्यावे लागेल अशी प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली. चालू आवर्तनात जेवढी पाण्याची बचत होईल तेवढे पाणी शेतकºयांना उन्हाळ्यात देता येईल, असेही ते म्हणाले.चोरी रोखल्याने दोन्ही दारे सुरूदोन्ही दारे चालू असण्याची गेल्या दहा वर्षातील ही पहिलीच वेळ हे केवळ पाणीचोरी रोखल्यामुळे शक्य झाले. पूर्ण क्षमतेने वितरिका सुरू आहे. ज्या क्षेत्राचे सिंचन व्हायला १५ दिवस लागायचे त्या क्षेत्राचे सिंचन केवळ सात दिवसात शक्य झाले, याचे श्रेय पाटबंधारे विभागाला द्यावेच लागेल.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी