शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दुष्काळाच्या झळा वाढल्या; पाणी टंचाईमुळे ७५७ टँकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:32 IST

यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पुण्यात शंभर वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देविभागात १३ लाख नागरिक ; पाऊणे दोन लाख पशुधन बाधित परिणामी पुणे विभागातील सोलापूर ,सांगली,सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यात

पुणे: सूर्याचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून बहुतेक ठिकाणी तापमानाची नोंद ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत होत आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहता अधिकच जाणवू लागली आहे. परिणामी पुणे विभागातील सोलापूर ,सांगली,सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यात ७५७ टँकर पाणी पुरवठा करावा लागत आहे. विभागात १३ लाख ४६ हजार ७८९ नागरिक आणि १ लाख ७२ हजार ७२८ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पुण्यात शंभर वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.त्यामुळे टँकरने पाणी पुरवठ्यात वाढ झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार विभागात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २२३ टँकरने पाणी पुरवठा केला जात असून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या १७९ टँकर पैकी एकट्या जत तालुक्यात १०३ टँकर चालू आहेत. साता-यात १९२ तर पुणे जिल्ह्यात १६३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या २५ दिवसांत सोलापूर जिल्ह्यात १५९ टँकर वाढले असून साता-यात ११३ तर सांगलीत ९१ आणि पुण्यात ८९ टँकर वाढले आहेत.त्यामुळे येत्या मे व जून महिन्यात टँकरची संख्या दीड ते दोन हजारावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात १९८ गावांतील आणि १ हजार ३०५ वाड्यांमधील ४ लाख १२ हजार २७६ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत.साता-या पेक्षा सांगली जिल्ह्यात कमी टँकर सुरू असले तरी सांगली जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ८८ नागरिक आणि ५५ हजार ५४३ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे. साता-यात ३ लाख ६ हजार ८१ नागरिक तर १ लाख १७ हजार १८५ पशुधन दुष्काळाने प्रभावित झाले आहे.------------विभागातील टँकरची आकडेवारी :  सोलापूर : सांगोला ४८,मंगळवेढा ५४,माढा १५,करमाळा ३४,माळशिरस ११, मोहोळ ८,दक्षिण सोलापूर २२,उत्तर सोलापूर १२,अक्कलकोट ११, बार्शी ८.  सातारा : माण ९५,खटाव ३१,कोरेगाव ३१,फलटण १९, वाई ५,खंडाळा  १ ,पाटण २,जावळी ३, महाबळेश्वर २,सातारा १,कराड २.  सांगली : जत १०३,कवठेमहाकाळ १३,तासगाव ११,खानापूर १४,आटपाडी ३३.      पुणे : आंबेगाव २१,बारामती ३७,दौंड २०,हवेली ८,भोर १,इंदापूर १०,जुन्नर १४,खेड ६,पुरंदर २१,शिरूर २३, वेल्हा २.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळWaterपाणी