शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

चालक-वाहकांनो पार्सल, वस्तूची ने-आण केल्यास होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:49 IST

- सर्वसामान्यांची लालपरी झाली व्यावसायिक

-  अंबादास गवंडी पुणे : एसटी प्रशासनाकडून पार्सल, वस्तूची ने-आण करण्यासाठी एका खासगी कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. यामुळे जर कोणाला एखादी वस्तू जरी द्यायची असेल तर त्यांनी या कंपनीमार्फतच द्यावी. परंतु शालेय विद्यार्थ्यांचे डबे एसटीतून पाठविण्याची सोय आहे. परंतु कर्मचारी पार्सल नेताना आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल, असे महामंडळाकडून नोटीस काढण्यात आले आहेत.

अनेकजण अचानक एखादे पत्र, औषध किंवा डबा द्यायचा असेल तर तो त्या भागातून जाणाऱ्या एसटीचे चालक अथवा वाहकाकडे देण्यात येत होता. कर्मचारीही ने-आण करत होते. पण आता सर्वसामान्यांची एसटी ही व्यावसायिक झाली आहे. त्यांच्याकडे दिलेली वस्तू हमखास आपण सांगितलेल्या व्यक्तीकडे सुरक्षितपणे जाते, इतका आत्मविश्वास असतो. ग्रामीण भागातील मुले शिक्षणासाठी, रोजगारासाठी, अभ्यासासाठी शहरी भागात सकाळीच येतात. पण सध्या नव्या नियमामुळे अनेक वाहक आणि चालक हे डबा किंवा महत्त्वाची औषधे, तत्काळ पोहोचविण्याची कागदपत्रेही नेत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण होत आहे.

शिवाय कंपनीकडून कुरिअर, साहित्य इत्यादी वस्तू वाहकाने काळजीपूर्वक नेणे आवश्यक आहे. या वस्तू गहाळ झाल्यास किंवा खराब झाल्यास त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यावर असणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

खासगी कंपनीला टेंडर

एसटी प्रशासनाकडून २०२७ पर्यंत एका खासगी कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. यासाठी बसस्थानकावर पार्सल कार्यालय सुरू आहे. येथून जी पार्सल मिळतात ती वाहकांनी काळजीपूर्वक न्यावी. अवैधरीत्या पार्सल नेऊ नये. तसे नेल्यास कारवाई करण्यात येईल, असे आदेश काढण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एसटीच्या चालक-वाहकांना शालेय विद्यार्थ्यांचे डबे नेण्यास बंदी नाही. परंतु पैसे घेऊन अवैधरीत्या ज्वलनशील वस्तू, पार्सलची ने-आण केले तर चालक आणि वाहकांवर कारवाई करण्यात येईल. - प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPublic Transportसार्वजनिक वाहतूकBus Driverबसचालकpassengerप्रवासी