खेड: पुणे-नाशिक महामार्गावर उभी असलेल्या पिकमधून पाऊणेतीन लाखांची रोकड चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:02 IST2021-12-15T14:52:29+5:302021-12-15T15:02:56+5:30
गाडीमध्ये किराणा माल भरून वाडा, डेहणे, खेड येथे दुकानदारांना देण्यासाठी आले होते

खेड: पुणे-नाशिक महामार्गावर उभी असलेल्या पिकमधून पाऊणेतीन लाखांची रोकड चोरी
राजगुरुनगर: दिवसाढवळ्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून गाडीतील दोन लाख ८६ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना राजगुरूनगरमध्ये घडली आहे. याबाबत वाहनचालक अर्जुन लक्ष्मण सांवत रा. भोमाळे (ता खेड )यांने खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन सांवत हे (डेहणे ता. खेड) येथील गणेश रामभाऊ कोरडे यांच्या पिकअप गाडीवर चालक म्हणून आहे. गाडीमध्ये किराणा माल भरून वाडा, डेहणे, खेड येथे दुकानदारांना देण्यासाठी आले होते. दुकानदारांकडून चालक सांवत यांने पैसे गोळा करून पिक गाडीच्या डिकीत ठेवले होते.
दि. १४ रोजी दुपारी ३ वाजता राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पुणे -नाशिक महामार्गालगत पिकअप गाडी उभी दरवाजा लॉक करून चालक सांवत हे धनश्री चौकातील धनश्री हॉटेलमध्ये बाथरुमला गेले असता, १० मिनटांत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून २ लाख ८६ हजारांची रोकड लांबवली. पुढील तपास खेड पोलिस करित आहे