शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पाणी प्यायला की सिंचनाला ? सिंचन पाणी कपातीने ग्रामीण भागात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:34 IST

पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे.

- विशाल शिर्केपुणे - पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे. पुण्याने आपला पाणीवापर मानकाप्रमाणे करावा, या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजादेखील ठोठावला आहे. प्रत्येक वेळी पाऊण लाख हेक्टर शेतीचे पाणी कमी करु देणार नाही, असे ठामपणे शेतकरी बोलू लागले आहेत.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ८९२ दशलक्ष लिटर (वार्षिक ११.५० टीएमसी) पाणी वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, २०११ ते २०१७ पर्यंत महापालिकेने १६ ते पावणेसतरा टीएमसी पाणीवापर केला आहे. तर, २०१७-१८ मध्ये १८.७१ टीएमसी इतका वार्षिक वापर झाला आहे. दुष्काळसदृश स्थिती आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश यामुळे अखेरीस महापालिका १३५० एमएलडी (वार्षिक १७.३९ टीएमसी) दैनंदिन पाणीवापरास तयार झाली. शहरासह लगतच्या गावांना खडकवासला धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणसाखळीतून पाणीपुरवठा होतो. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २९ टीएमसी आहे. ही धरणे मूळची सिंचनासाठी बांधलेली. शहराची गरज म्हणून महापालिकेशी जलसंपदा करार करते. त्यानुसार पावसाळा संपल्यानंतर कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यावर सिंचन, पाणी आणि उद्योगाला किती पाणी द्यायचे हे ठरते. वार्षिक ३ टीएमसीचे बाष्पीभवन गृहीत धरून नियोजन केले जाते. साधारण रब्बी आणि उन्हाळी अशी चार आवर्तने शेतीला देणे अपेक्षित आहे.महापालिकेने पाण्याची गळती ३५ वरून १५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविता येऊ शकते. तसेच, शेतीसाठी देखील यापुढे ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा लागेल. तरच, महापालिका आणि शेतीसाठी पाण्याचा समतोल राखला जाऊ शकतो.- जलसंपदा विभागपुणे महापालिका मापदंडानुसार पाणीवापर नसल्याने सिंचनाच्या पाण्यावर ताण येत आहे. उपलब्ध पाण्यानुसार दरवर्षी पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार रब्बीत दोन आणि उन्हाळ्यात दोन आवर्तन देणे अपेक्षित आहे. शहराचा पाणीवापर सातत्याने वाढल्यास ते शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकेने मापदंडानुसार पाणी वापरावे, अशी आमची मागणी आहे. महापालिकेने गळती कमी केल्यास आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.- विठ्ठल जराड, याचिकाकर्ते शेतकरी, बारामती

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे