शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

केळद खिंडीत दरड कोसळली

By admin | Updated: June 21, 2015 00:05 IST

वेल्हा तालुक्यातील पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्यावरील केळद खिंडीजवळ शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास प्रचंड मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली.

कापूरहोळ : वेल्हा तालुक्यातील पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्यावरील केळद खिंडीजवळ शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास प्रचंड मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. या कोसळलेल्या दरडीमुळे पासली परिसर व केळद पंचक्रोशी परिसरातील असणाऱ्या १६ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे़ आज सकाळच्या शाळा असल्याने सुदैवाने विद्यार्थी तसेच पालक बचावले. आज दुपारी वेल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या मढीघाटात निघालेले प्रवासी यातून सुदैवाने बचावले. वेल्ह्यातून बाजार व साहित्य घेऊन केळद व त्याहून पुढे असणाऱ्या गावातील लोक आज सायंकाळी ६.०० वाजता वेल्ह्यातून घरी परत असताना पूर्णत: या दरडीमुळे त्यांना घरी जाता आले नाही. केळद खिंडीच्या वरच्या बाजूला डोंगरातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंगापूरला जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केलेला असून या रस्त्याचे मोठमोठे दगड, माती, मुरूम हे या खिंडीच्या रस्त्याच्या लगत बेजबाबदारपणे टाकून पावसाळ्यात काय होईल, याचा विचार केला नाही. वेल्ह्यात आज दिवसभर प्रचंड मुसळधार पावसामुळे या खिंडीच्या लगतचे दगड, माती, मुरूम तसेच न उकरलेले दगड रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली.याबाबत वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, की या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवले आहे़ २ जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेली माती, दगड काढण्याचे काम सुरु आहे़ उद्या सकाळपर्यंत रस्ता पूर्ववत सुरु होईल़ सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन रस्ता करताना डोंगर खोदाई तिरकी न करता सरळ केल्याने पावसामुळे मोकळे झालेले दगड, माती रस्त्यावर आली़ सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या पूर्वी सर्व्हे केला आहे़ करणवडी येथील धोकादायक भाग काढून टाकला आहे़ आता पाऊस सुरु झाल्याने पुन्हा एकदा सर्व्हे करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़