पुणे : महापालिकेच्या वतीने अत्यंत गाजावाजा करत राजीव गांधी हॉस्पिटल आणि सोनवणे हॉस्पिटल येथे खाजगी संस्थांच्या मदतीने नवजात बालकांसाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे एनआयसीयू कक्ष सुरु करण्यात आले. परंतु, सहा महिन्यांतच या एनआयसीयूला गळती लागली असून यामुळे संसर्ग होण्याच्या भीतीने महापालिकेला एनआयसीयू बंद करण्याची महापालिकेवर नामुष्की आली आहे.शहरातील राजीव गांधी हॉस्पिटल, सोनवणे हॉस्पिटल, दळवी हॉस्पिटल आणि कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये पायाभूत सोयीसुविधांसह सुधारणा करण्याकरिता महापालिकेच्या वतीने मुकुल माधव फाउंडेशन सोबत खास करार करण्यात आला.यामध्ये राजीव गांधी हॉस्पिटल आणि सोनवणे हॉस्पिटल या दोन रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी (एनआयसीयू) सुरु करण्यात आले. यासाठी संस्थेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली. त्यानंतर पालकमंत्री, महापौर यांच्या हस्ते गाजावाजा करत या एनआयसीयू कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातील या एनआयसीयू कक्षामध्ये ड्रेनेजच्या पाण्याची गळती सुरु झाली. महापालिकेच्या भवन विभागाच्या वतीने तात्पुरती डागडूजी करण्यात आली. परंतु, पुन्हा येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरु होऊन ड्रेनेजचे पाणी थेट कक्षात येऊ लागले. यामुळे कक्षात संसर्ग होण्याच्या भीतीने या कक्षातील बालकांना सोनवणे हॉस्पिटल येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मात्र महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्याच्या सुविधांचे कसे तीन-तेरा वाजले असल्याचे समोर आले आहे.
राजीव गांधी रुग्णालयाच्या ‘एनआयसीयू’त ड्रेनेजचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 19:04 IST
गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातील एनआयसीयू कक्षामध्ये ड्रेनेजच्या पाण्याची गळती सुरु झाली. महापालिकेच्या भवन विभागाच्या वतीने तात्पुरती डागडूजी करण्यात आली.
राजीव गांधी रुग्णालयाच्या ‘एनआयसीयू’त ड्रेनेजचे पाणी
ठळक मुद्देगळतीमुळे एनआयसीयू बंद करण्याची महापालिकेवर नामुष्कीसंसर्ग होण्याच्या भीतीने या कक्षातील बालकांना सोनवणे हॉस्पिटल येथे स्थलांतर करण्याचा निर्णयसंस्थेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक उपकरणे खरेदी