शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Dr. DY Patil महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये CCTV; प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:46 IST

महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावले असून विद्यार्थ्यांकडून ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याच्या बजरंग दलाचा आरोप

पुणे : पुण्यातील तळेगावात डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात काल एक धक्कादायक प्रकार समोर आला. महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये  सीसीटीव्ही लावले असून विद्यार्थ्यांकडून ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याच्या आरोप बजरंग दलाने केला आहे. याप्रकरणी प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाणही झाली असून हा प्रकार थांबवून प्राचार्यांची बदली करा अशी मागणी केली जात आहे.

महाविद्यालयातील शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी बजरंग दलाकडे याबाबत तक्रार केली असल्याचे दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर तातडीने त्यांनी महाविद्यालयात जाऊन पाहणी केली असता दोन्ही गोष्टी निदर्शनास आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत पालकांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु प्राचार्यांनी दुर्लक्ष केल्याचे पालकांनी सांगितले आहे. त्यानंतर बजरंग दलाने हा प्रकार थांबवण्यासाठी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. 

 महाविद्यालयात उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगलं आहे. त्यामुळं लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही नेमके कोणत्या कारणासाठी बसवण्यात आले होते? यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही आहे. बजरंग दल आणि पालकांकडून प्राचार्यांच्या बदलीची मागणी होऊ लागली आहे. तसेच  ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याचा प्रकार तातडीने थांबवण्यात यावा अशी मागणी देखील पालकांनी केली आहे. 

 प्राचार्यांची लवकरात लवकर बदली करावी

आमच्या मुलांकडून दररोज ख्रिश्चन समाजाची प्रार्थना म्हणून घेतली जाते. तसेच त्यांना टॉर्चर केले जात आहे. हिंदूंच्या कुठल्याही सणाला मुलांना सुट्टी दिली जात नाही. तसेच लेडीज टॉयलेटमधेही सीसीटीव्ही लावल्याचा धक्कादायक प्रकार  आमच्यासमोर आला आहे. याबाबत संस्थेने कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच अशा प्राचार्यांची लवकरात लवकर बदली करावी. अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीस