शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण: सीबीआयकडून अद्याप तपास पूर्ण झाला नाही, ही वेदनादायी बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 12:32 IST

सीबीआयने खऱ्या सूत्रधारांचा शोध घ्यायलाच हवा आहेत: मुक्ता,हमीद दाभोलकर

ठळक मुद्देडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला २० ऑगस्ट रोजी सात वर्षे पूर्ण अन्यथा विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्‍तीला असलेला धोका नाही संपणार

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला २० ऑगस्ट रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. सीबीआय या देशातील प्रतिष्ठित तपास यंत्रणेकडून खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्‍तीला असलेला धोका संपणार नसल्याचे परखड मत मुक्‍ता दाभोलकर व डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्‍त केले. 

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी निर्घृण खून झाला. खुनानंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासाची अक्षम्य हेळसांड केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. सीबीआयने २०१६ मध्ये संशयित आरोपी म्हणून डॉ. वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर व सचिन अंदुरे आणि मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही. खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. परंतु सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खाडीत पिस्तुल सापडल्यानंतर पुढे तपास सरकलेला नाही,याकडे दोघांनी लक्ष वेधले. दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारीमध्ये झाली आहे. कर्नाटक एसआयटीने झारखंड येथून ऋषीकेश देवडीकर या तेथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीस लंकेश खुनातील संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. यावरून हे खून करणाऱ्या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात‌ येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

-------------- 

योगेंद्र यादव यांचे व्याख्यान 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी जवाब दो आंदोलन व व्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदा ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते व स्वराज अभियानचे संस्थापक योगेंद्र यादव यांचे 'करोना के बाद स्वराज का अर्थ' या विषयावरील व्याख्यान २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता करोनामुळे फेसबुकद्वारे ऑनलाइन होणार आहे. -------

टॅग्स :PuneपुणेCBIगुन्हा अन्वेषण विभागMurderखूनNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरPoliceपोलिसMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती