डॉ. कारभारी काळे स्वीकारणार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:19 PM2022-05-18T12:19:55+5:302022-05-18T12:22:10+5:30

डॉ. कारभारी काळे यांच्याकडे पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार

dr karbhari kale will take over the post of Vice Chancellor of Pune University | डॉ. कारभारी काळे स्वीकारणार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार

डॉ. कारभारी काळे स्वीकारणार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार सोपवला आहे.

येत्या बुधवारी सायंकाळी ५ वाजता काळे हे करमळकर यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. राज्यपाल व राज्य शासन यांच्यातील कुलगुरू निवडीबाबत सुरू असलेल्या वादामुळे पदाची निवड प्रक्रिया रखडली. त्यामुळे डॉ. नितीन करमळकर यांच्या निवृत्तीनंतर पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले नाहीत.

विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज अधिक काळ प्रभारी कुलगुरूंकडे देणे योग्य नाही. तसेच अधिष्ठाता नसल्यास अनेक शैक्षणिक कामे रखडू शकतात. त्यामुळे शासनाने पूर्णवेळ कुलगुरू निवडीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: dr karbhari kale will take over the post of Vice Chancellor of Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.