डोर्लेवाडी परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:31+5:302021-04-25T04:09:31+5:30

डोर्लेवाडी :डोर्लेवाडी परिसरात कोरोनाने मागील आठ दिवसांपासून रूग्णसंख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी (दि. २४) एका दिवसात ...

In Dorlewadi area | डोर्लेवाडी परिसरात

डोर्लेवाडी परिसरात

डोर्लेवाडी :डोर्लेवाडी परिसरात कोरोनाने मागील आठ दिवसांपासून रूग्णसंख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी (दि. २४) एका दिवसात ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे तब्बल १८ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळेच संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. गावची परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर चाललेली आहे. गावात एकूण सक्रिय रुग्ण १२१ व ५ मृत्यू झाले आहेत. रोज गावामध्ये सरासरी १० रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून वीकेंड लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदीसह अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, पूर्व हवेलीमधील नागरिक मात्र आमच्या हद्दीच येऊच शकत नाही, अशा आविर्भावात व विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित राजरोसपणे फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच बारामती शहर पोलिसांनी विनामास्क फिरणारे व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु न केल्याने, डोर्लेवाडी ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू शकते.

-----------------

डोर्लेवाडी व परिसरात एकूण रुग्ण -

डोर्लेवाडी - १२१

झारगडवाडी -४३

सोनगाव - १४

एकूण लसीकरण -१३९३

--------------------------

Web Title: In Dorlewadi area