गाड्यांवर 'दादा मामा' लिहू नका, नियमात वागा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 05:38 PM2019-12-14T17:38:18+5:302019-12-14T17:43:46+5:30

अजित पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर असून त्यांनी शहरासह पिंपरी - चिंचवड भागातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. 

Don't write 'Dada Mama' on the car and number plates ; Ajit Pawar | गाड्यांवर 'दादा मामा' लिहू नका, नियमात वागा 

गाड्यांवर 'दादा मामा' लिहू नका, नियमात वागा 

Next

पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड या आपल्या होमपीच'वर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली आहे. सरकार आपलं आहे तेव्हा गाड्यांवर 'दादा, मामा' लिहू नका, नियमात वागा अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. 

 अजित पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर असून त्यांनी शहरासह पिंपरी - चिंचवड भागातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की. महाविकासआघाडीचे सरकार आले  म्हणून अतिउत्साह दाखवून उतू नका, मातू नका, जमिनीवर पाय ठेवून काम करा.सरकार आपलं आलं म्हणजे जबाबदारी वाढली आहे, अन्याय झाला तर मागे उभा राहील, पण कायदा मोडला तर मीच पोलिसांना सांगेल, त्यामुळे नियम पाळा असं सांगायलाही ते विसरले नाहीत. 

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  •  कालपर्यत जे तिकडे होते, ते आज बुके घेऊन इकडे आले, तुम्ही लगेच पाघळता  
  •   पंकजा मुंडे आणि भाजप हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न त्यात नाक खूपसण्याची गरज नाही. 
  •   पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई केली,कोणी टँकर माफिया आहे का हे बघावं लागेल  
  •   महानगर पालिकेच्या कामात मरगळ आलेली आहे. जो कोणी विकासकामात हलगर्जीपणा करेल त्याची हयगय केली जाणार नाही.   
  • कामगारांची नगरी म्हणून आपली ओळख आहे, मात्र सगळया उद्योगांची वाताहत झालीये, त्यावर आपल्याला उपाययोजना करावी लागेल. 

Web Title: Don't write 'Dada Mama' on the car and number plates ; Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.