शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

Pune Accident: काळजी करू नका, व्यवस्थित उपचार केले जातील; जखमी विद्यार्थ्याला एकनाथ शिंदेंचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 22:12 IST

एकनाथ शिंदेंनी प्रशांत बंडगर या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काळजी करू नका व्यवस्थित उपचार केले जातील असे आश्वासन दिले.

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत चालकाने मद्यपान केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यवर्ती भागातून असे मद्यपी गाड्या चालवत असतील. तर सामान्य माणसाने रस्त्याने चालायचे कसे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात प्रशांत बंडगर या विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या भावे हायस्कुल परिसरातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी प्रशांतचे बोलणे करून दिले. एकनाथ शिंदेंनी प्रशांत बंडगर या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काळजी करू नका व्यवस्थित उपचार केले जातील असे आश्वासन दिले. तुमच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही असेही ते यावेळी म्हणाल्याचे बंडगर याने सांगितले आहे.  

अविनाश दादासो फाळके ,प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात गेतले असून तो मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहासाठी एकत्रित आले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बारा जणांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार या बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अन्य नऊ किरकोळ जखमींना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

अरुंद रस्ते तरीही मोठा अपघात 

शहराच्या मध्यवर्ती भागात भावे हायस्कुल जवळ हा अपघात झाला आहे. या परिसरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. २ चारचाकी एकत्र आल्या तरी ट्राफिक झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मद्यधुंद चालकाने १२ जणांना उडवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. सर्व जण जखमी झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे. 

भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी काही विद्यार्थी असून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्याची एक परीक्षा उद्या होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल. - हेमंत रासने, आमदार कसबा विधानसभा

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातEknath Shindeएकनाथ शिंदेPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलShiv Senaशिवसेना