शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या बापाने केली ती चूक तुम्ही करू नका’, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा दिंडीद्वारे सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:49 IST

चिमुकल्यांच्या हातात, आत्महत्या हा पर्याय नाही, व्यसन करू नका, गुन्हेगारीकडे वळू नका, असे संदेश देणारे फलक देखील आहेत

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी (दि. २०) शहरात मुक्कामी आगमन झाले. यावेळी असंख्य दिंड्या या पालखी महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. प्रामुख्याने सामाजिक जाणिवांची शिकवण देणारी वारी म्हणूनही यंदाच्या पालखी सोहळ्याकडे बघितले जाऊ शकते. त्र्यंबकेश्वर येखील आधारतीर्थ आश्रमातील ५० चिमुकले हाच संदेश घेऊन आळंदी ते पंढरपूर मार्गावर दिंडीत सहभागी झाले आहेत.

राज्यातील आत्महत्याग्रस्त, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारतीर्थ आश्रम काम करते. या आश्रमातील २५ मुले आणि २५ मुली यंदाच्या वारीत सहभागी झाले आहेत. ‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका’ असा संदेश हे चिमुकले वारीद्वारे देत आहेत. यासह चिमुकल्यांच्या हातात, आत्महत्या हा पर्याय नाही, व्यसन करू नका, गुन्हेगारीकडे वळू नका, असे संदेश देणारे फलक देखील आहेत. वर्ष २००९ पासून या आश्रमातील मुले दरवर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी या मुलांना शिकवण्याचे काम करतात. याच संस्थेतील २५ मुली आज शिक्षिका, २ मुली पोलिस उपनिरीक्षक म्हणून समाजात कार्यरत असल्याचे आश्रमाचे पदाधिकारी त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितले.

देवा, भरपूर पाऊस पडू दे..

दिंडीत सहभागी झालेल्या या मुलांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, ‘आम्हाला आमच्यासाठी काही नको; पण जी वेळ आमच्यावर आज आली आहे ती कुणावरही न येवो’ अशी मागणी आमची पांडुरंगाकडे आहे. देवा, भरपूर पाऊस पडून दे, कुणालाही आत्महत्या करायला लागू नये, अशी आमची आर्त विनवणी विठ्ठलाचरणी असल्याचे या चिमुकल्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025PandharpurपंढरपूरFarmerशेतकरी