शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'येथे शेकोटी करू नका...' वादातून अल्पवयीन मुलांनी केला टपरी व्यावसायिकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:06 IST

पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु

पुणे: येथे शेकोटी करुन नका असे सांगितल्याच्या कारणावरुन अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका टपरी व्यावसायिकाचा पालघन, दगडाने मारहाण करुन खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आशिष रमेश कांबळे (वय ३५, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रविण मधुकर गायकवाड (वय ४८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ६ अल्पवयीन मुलांसह इतरांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अरुणकुमार वैद्य वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाबाहेर रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कांबळे हे टपरी व्यावसायिक असून अरुणकुमार वसाहतीतील सुरती मोहल्ला येथे राहतात. त्यांच्या वस्तीत राहणार्यांशी त्यांचा यापूर्वी वाद झाला होता. शनिवारी रात्री काही मुले पार्क केलेल्या गाड्यांच्या जवळ शेकोटी पेटवत होते. त्यावेळी आशिष कांबळे यांनी त्यांना इथे शेकोटी पेटवू नका, गाड्यांना आग लागेल, असे सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मध्यरात्री आशिष हे शौचालयात जात असताना एका १४ वर्षाच्या मुलाने इतरांच्या मदतीने लोखंडी पालघन, दगड व सिमेंटच्या ब्लॉकने अशिषच्या डोक्यात मारले. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक सुडगे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू