शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:21 IST

“तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती

पुणे: ५१ तोळे सोनं, आलिशान फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि धुमधडाक्यात लग्न लावून दिल्यानंतरही वैष्णवी हगवणेचा सासरी छळ सुरू होता. सासरा, सासू, पती, दीर, नणंद सगळेच वैष्णवीचा छळ करायचे. इतकंच नाही तर तिला मारहाणही करायचे. अखेर वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली  त्यानंतर आता हगवणे कुटुंबीयांनी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. अशातच शशांक हगवणे याने दुसरं कुणाशी लग्न करू नये. म्हणून वैष्णवीला धमकवल्याची माहिती समोर आली आहे.

 “तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती. जी तिच्या मोबाईलवरील काही चॅट्स व कॉल रेकॉर्डिंग्समध्ये असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. वैष्णवीचं दुसऱ्याशी लग्न होऊ नये म्हणून शशांकने तिचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी धमक्या देऊन तिच्याशी लग्न करून नका असंही सांगितल्याची माहिती समोर आली आहे. कस्पटे कुटुंबीयांनी स्थळे बघण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी वैष्णवीला मुलं पाहण्यास येत होती. त्या मुलांना शशांकने फोन करून वैष्णवीशी लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका अशी धमकी दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. 

वैष्णवीच्या हट्टासमोर मामाही हतबल 

वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांशी बोलताना लग्नाला सगळ्यांचा विरोध असल्याचे सांगितले होते. मामा म्हणाले होते की, हे लव्ह मॅरेज आहे. त्याला सगळ्यांचा विरोध होता. घरातील सगळ्यांचा विरोध असूनही वैष्णवीने माझ्याकडे लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता. तिला त्याच्याशीच लग्न करायचं होत. त्यांच्या घरात यावरुन वाद झाले. त्यावेळी वैष्णवीचे वडील आनंद ऍडमिट होते. शशांक तिच्या घरी इथं आला. आणि आपण पळून जाऊन लग्न करू असं म्हणत तिला चल म्हणाला. त्यावेळी तिने माझ्या मुलाला पळून लग्न करणार असल्याचे सांगितले. माझ्य मुलाने असं काय निर्णय घेऊ नको. वडील आयसीयू मध्ये आहेत असे सांगून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्याने लगेच मला फोन करून सांगितलं. आम्ही धावतपळत घरी आलो. तिला समजावून सांगितलं. तसेहच शशांकला फोन करून सांगितलं कि आपण निर्णय नंतर घेऊ. त्यानंतर आपली समाजात बदनामी होऊ नये. म्हणून लग्न लावून दिल असल्याची माहिती मामाने दिली होती. 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसwakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण