शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लेम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना CCTV कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:23 IST

सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, लोकांनी प्रकरण लावून धरल्याने गुन्हा दाखल

किरण शिंदे 

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव वेगात धावणाऱ्या एका लेम्बोर्गिनी कार ने श्वानाला जोरात धडक दिली. या धडकेत श्वानाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुडलक चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात निळ्या रंगाच्या लेम्बोर्गिनी चार चाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नीना नरेश राय (वय 57) या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या सामाजिक कार्यकर्ते आहेत. नुसार सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात धावणाऱ्या लेम्बोर्गिनी कार चालकाने गुडलक चौकात एका श्वानाला जोराची धडक दिली. यामध्ये श्वानाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता तितक्याच वेगाने पळून गेला. 

घटनेनंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र फिर्यादी आणि अन्य काही लोकांनी प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर कार मालकाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले मात्र गुन्हा दाखल करतेवेळी त्याचे नाव टाकले नाही असा आरोप फिर्यादी निना राय यांनी केला आहे. दरम्यान डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी भादवी 279, 429 सह प्राण्यास क्रूरता प्रतिबंध कायदा 11(1), 11 (A) (L) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातdogकुत्राPoliceपोलिसDeathमृत्यू