शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकरांचे नाव काढून तुम्हाला अजितदादांचे नाव द्यायचे आहे का? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:08 IST

शिंदे आणि फडणवीस यांनी होळकरांच्या नावाचा जो जीआर काढला आहे, या जीआरमध्ये जर बदल झाला तर महाराष्ट्रात गावागावात खूप मोठे जन आंदोलन आम्ही उभे करू

पुणे: तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नामकरण केलेले होतं. त्यांच्या नावात बदल करण्याचा प्रकार येथे होतो आहे त्याच्या निषेधार्थ एकत्रित आलो आहे. आमचा अजित दादांच्या नावाला इतर कुठे संस्थांना नामकरण होत असेल तर आमचा विरोध नाही. मात्र अहिल्यादेवी होळकरांच्या नावात छेडछाड करण्याचा प्रयत्न कोणत्या महाभागाच्या डोक्यातून पुढे आलेला आहे? महान कार्य देशभरामध्ये उभ करणाऱ्या हजारो अहिल्यादेवी होळकरांच्या फॉलोवरच्या विरोधात जाऊन नावात खडाखोड कोणाला करावीशी वाटते याचा शोध घेण्यासाठी आलो असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. शासनाने काढलेल्या नवीन जीआरबाबत ते बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  

हाके म्हणाले, शासनाला इशारा देत आहोत. तुम्ही जो जीआर काढला आहे तो तात्काळ रद्द करावा. जो शिंदे आणि फडणवीस यांनी होळकरांच्या नावाचा जो जीआर आहे. त्यात तात्काळ दुरुस्ती महाविद्यालय व स्वरोपचार रुग्णालय करावे. काही पुढारी सर्वोच्च रुग्णालयाला वेगळे नाव देऊ इच्छितात त्यांना सांगतो की,  त्याचे देखील नाव अहिल्यादेवी होळकरांचेच आहे. हे नाव उतरवणार का? काढणार का तुम्ही? दादांचे नाव द्यायचे असेल तर कृषी विज्ञान केंद्राला द्या. आम्ही स्वागत करू. मात्र होळकरांच्या दिलेल्या नावात चर्चा करून तुम्हाला त्या ठिकाणी अजित दादांचे नाव द्यायचे आहे का? हे सुनेत्रा पवारांना देखील माहित नसावं. आम्ही त्यांचीही भेट घेऊ. तुम्ही ऐकणार नसाल तर दुर्दैवाने आम्हाला या गोष्टीसाठी आंदोलन करावे लागेल. एका बाजूला तुम्ही सांगताय की दादांच्या जाण्याने आम्हाला दुःख झालेला आहे. मात्र अहिल्यादेवी होळकरांचे नाव काढून त्या ठिकाणी अजित पवारांचे नाव देणे सुनेत्रा पवारांना देखील आवडणार नाही. कारण त्या महिला पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. जनसामान्यांच्या कैवारासाठी काम करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बदललं जात असेल त्यासाठी निषेध करण्यासाठी इथे जमलो आहोत. या जीआरमध्ये जर बदल झाला खडाखोड झाली तर महाराष्ट्रात गावागावात खूप मोठे जन आंदोलन आम्ही उभे करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Remove Ahilyadevi Holkar's name, give Ajit Dada's? Hake questions government.

Web Summary : Laxman Hake opposes changing Ahilyadevi Holkar's name at Baramati hospital. He warns of statewide protests if the government alters the name to Ajit Pawar's, suggesting alternatives instead. Sunetra Pawar's stance is also questioned.
टॅग्स :Puneपुणेlaxman hakeलक्ष्मण हाकेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSunetra Pawarसुनेत्रा पवारBaramatiबारामतीhospitalहॉस्पिटल