शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात शेतीच्या कामे करण्यासाठी कायम मजुरांची टंचाई भासत आहे. मजुरीचे दरही पूर्वीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात शेतीच्या कामे करण्यासाठी कायम मजुरांची टंचाई भासत आहे. मजुरीचे दरही पूर्वीच्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बारामती परिसरात आठ दिवस मजुरांचे वेटिंग करावे लागत आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतातील कामे प्रलंबित राहत असल्याचे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

पेरणी, खुरपणी, तण काढणे, खत टाकणे, तोडणी करणे यासारखी कामे करावी लागतात. यासाठी मजुरांची आवश्यकता नेहमी भासते. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पूर्व मशागतीच्या कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते. एका मजुराचा दिवसाचा दर हा पूर्वी १५० रुपयांपयर्यंत होता. मात्र, हे दर आता वाढले आहेत. महिला कामगाराला जवळपास २०० ते २५० तर पुरुष कामगाराला ३०० पर्यंत दर आहे. एकीकडे खतांचे, बियाणांचे भाव वाढल्याने शेतीचा खर्चात वाढ झाली आहे. त्यात मजुरांचाही खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतात जे पिकेल त्याला चांगला भाव मिळेल याची शाश्वतीही राहिलेली नाही.

जिल्ह्यात ऊस, कांदा, द्राक्ष, टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, तसेच तरकारी पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.

उसाला चांगला दर असल्यामुळे मजुरीचा दर ही गगनाला भिडले आहेत. मजूर सांगतील ठरवतील तो दर शेतकऱ्याला द्यावा लागतो, उसाची मशागत, लागवड, खांदणी बांधणी याचे दर शेतकरी न ठरवता मजूरच ठरवत असतात. उसाची एकदा खांदणी बांधणी झाली की तशी या पिकाला मजुरांची फारशी गरज पडत नाही. मात्र ऊस तुटून गेल्यावर गहू, सोयाबीन, टोमॅटो इतर भाजीपाल्यासाठी मात्र मजुरांचा तुडवडा जाणवतो, ज्या पद्धतीचे पीक तसा मजुरीचा दर असतो.

ज्वारी, मका कडवळ, कांदा व इतर भाजीपाल्याची पिके घेतात. वरील सर्वच पिके ही तीन ते चार महिन्याची असतात. त्यामुळे जिरायती भागात नेहमीच शेती मजुरांचा तुटवडा जाणवत असतो. या भागातील शेतकऱ्यांना रोजच मजुरांची गरज पडते.

——-

काय म्हणतात शेतकरी ?

मजुरांचा तुटवडा हे आता नित्याचेच झाले आहे. महिला कामगाराला २०० तर पुरुषाला ३०० रुपये रोज ते ठरवतील तो दर असतो, शेतकऱ्याच्या हातात काही नाही. आज एवढे पैसे देता का तर कामाला येतो नाही तर मला वेळ नाही निघालो मी अशीच मजुरांची भाषा असते.

—-

-मिलिंद वायाळ,

ऊस उत्पादन शेतकरी होळ

——

१५० ची खुरपणी २०० पण जाऊन पोहचली. प्रत्येक घुरपणी ला वेगळा दर, उसातली खुरपणी असेल तर ३०० रुपये, एवढ पैसे देऊन पण आठ दिवस अगोदर मजूर बुकिंग करायचं आणि पुरुष मजूर रोजाने काम करण्यापेक्षा उक्त काम मागतात. दिवसाचे काम तासात करून ५०० रुपये मिळवायचे. - अशोक पवार शेतकरी मोरगाव (तरडोली)

———

मजूर टंचाई आणि मजुरीत वाढ हा तर कायमचाच प्रश्न आहे. मजुरांच्या आठ-आठ दिवस वेटिंगमुळे शेताची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे काहीशा नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

- प्रमोद देव : शेतकरी सुपे

———————————————

यंत्राने होणारी कामे

ट्रॅक्टरच्या साह्याने लागवडीची कामे केली जाते. मशागतीचीही कामासाठी वापर होतो. कापणीसाठी हारवेस्टरचा वापर केला जातो.

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

पूर्वी मशागतीच्या कामासाठी बैलांचा वापर केला जात होता. मात्र, त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली. जिल्ह्यात भात लावणीसाठीही यंत्राचा वापर केला जात आहे. ऊस तोडणीसाठीही अनेक ठिकाणी हार्वेस्टरचा वापर केला जातो. लागवड आणि काढणीसाठी आता केवळ मजुरांचा वापर केला जातो.