शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याकडे रागाने बघतो काय', एकाच्या डोक्यावर केले कुऱ्हाडीने वार; परिसरातही माजवली दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:56 IST

जिवे मारण्याचा प्रयत्न करून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करणा-यास पोलीसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देपरिसरात दहशत माजवल्याने लोकांनी त्यांच्या घराचे दरवाजे - खिडक्या केल्या बंद

लोणी काळभोर: “माझ्याकडे रागाने बघतो काय आता कसा जगतोय बघतोच, कोण - कोण मध्ये येत आहे पाहतोच, जो मध्ये येईल त्यांचे आज तुकडेच करतो” अशी धमकी देत विनाकारण एकाच्या मान, डोके व पोटावर कु-हाडीने वार केले. तसेच त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करणा-यास पोलीसांनी अटक केली आहे. 

या मारहाणीत नितिन बापू गायकवाड ( वय ३४, रा. कदमवाकवस्ती, हवेली ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी उज्वला ( वय २७ ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आकाश दगडू आढाळे ( वय २८ ) याला अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितिन गायकवाड हे प्लंबिगचे काम करतात. ते राहत असलेल्या सिध्दार्थ नगर येथे दोन तीन घरे सोडून पुढे अक्षय आढाळे राहतो. तो नेहमी गायकवाड यांच्याकडे येता - जाता रागाने बघून डिवचत असे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गायकवाड हे पत्नीसमवेत दुचाकीवरून भाजी आणण्यासाठी निघाले.

त्यावेळी त्यांच्या घराजवळील चौकात अक्षय अढाळे हा उभा होता. त्याने गायकवाड यांच्याकडे रागाने पाहिल्याने गाडी थांबवून त्यास जाब विचारला असता त्याने थांब बघतोच तुझ्याकडे असे म्हणून शिवीगाळ केली. वाद नको म्हणुन पती - पत्नी तेथून निघून गेले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते परत आले तेव्हा चौकामध्ये आढाळे उभा होता. गायकवाड हे त्यांच्या बहिणीकडे  गेले. त्यांच्या घरी ७ - ३० वाजण्याच्या सुमारांस पतीचा मोठयामोठयाने आवाज येत आल्याने उज्वला व सासु प्रभा घराबाहेर आल्या तेव्हा आढाळे हा कुऱ्हाडीने गायकवाड यांच्या डोक्यात मारत होता.

तेव्हा उज्वला पळत गेल्या असता त्यांच्याही अंगावर कु-हाड उगारुन त्यांच्या पतीच्या मानेवर कु-हाडीने जोरात मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे लोकांची गर्दी जमा झाली. त्यावेळी अक्षय यांने त्यांचे हातातील कुऱ्हाड हवेमध्ये फिरवून दहशत निर्माण करुन “माझ्याकडे रागाने बघतो काय आता कसा जगतोय बघतोच, कोण - कोण मध्ये येत आहे पाहतोच, जो मध्ये येईल त्यांचे आज तुकडेच करतो” असे म्हणुन मोठयामोठयाने ओरडु लागला. तेव्हा तेथे असणारे इतर लोक सैरावैरा पळुन गेले. तेथील परिसरातील लोकांनी त्यांचे घराचे दरवाजे खिडक्या बंद करुन घेतल्या. त्यानंतर गायकवाड यांना कदमवाकवस्ती येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू