विद्यार्थी मित्रहो काही अडचणींमुळे उच्च शिक्षणाची पदवी राहिली आहे का? विद्यापीठाने घेतला हा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 02:01 PM2021-04-14T14:01:58+5:302021-04-14T14:03:00+5:30

विद्यार्थ्यांना आता त्यांचे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करता येणार

Do you have any higher education degree due to some difficulties? This decision was taken by the university | विद्यार्थी मित्रहो काही अडचणींमुळे उच्च शिक्षणाची पदवी राहिली आहे का? विद्यापीठाने घेतला हा निर्णय

विद्यार्थी मित्रहो काही अडचणींमुळे उच्च शिक्षणाची पदवी राहिली आहे का? विद्यापीठाने घेतला हा निर्णय

Next
ठळक मुद्देजुन्या विद्यार्थ्यांना सध्याच्या अभ्यासक्रमानुसार विषय घेऊन परीक्षा देण्याची मुभा

पुणे: उच्च शिक्षणात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक-कौटुंबिक अशा काही अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. संबंधित विद्यार्थ्याला काही वर्षांनी पुन्हा राहिलेले शिक्षण पूर्ण करायची इच्छा झाल्यास तोपर्यंत अभ्यासक्रम बदललेला असतो. पूर्वीच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची मुभा नसल्याने अनेकांना पदवीपासून वंचित राहू नये. म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नियमावलीत काही महत्त्वपूर्ण बदल करत जुन्या अभ्यासक्रम, विषयांना समकक्षता दिली असून, त्यानुसार २०१६-१७ पूर्वीचे विद्यार्थी आताच्या अभ्यासक्रमाचे विषय घेऊन त्या परीक्षेची पदवी मिळवू शकणार आहेत. काही ना काही कारणाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे राहावे लागते. मात्र ही उणीव आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दूर केली आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेने जुन्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन पदवी मिळवण्याची सुविधा प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१६-१७ पूर्वीच्या जुन्या पॅटर्नला समकक्षता देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतला. परीक्षा व मूल्यमापन विभागाने त्याची कार्यपद्धती ठरवली आहे. त्यानुसार संबंधित जुन्या विद्यार्थ्यांना सध्याच्या अभ्यासक्रमानुसार विषय घेऊन परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळेल. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे. 

नव्या शैक्षणिक धोरणातही तरतुदी 

सुमारे पाच टक्क्यांच्या आसपास विद्यार्थी शिक्षणातून बाहेर जातात. त्यांना शिक्षण पूर्ण करायची इच्छा असल्यास आता संधी मिळू शकेल. तसेच विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण केल्याचे मानसिक समाधान, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यही मिळेल. अशी तरतूद नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. त्या धर्तीवरच जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात येता येईल. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असेही डॉ. काकडे यांनी नमूद केले.

Web Title: Do you have any higher education degree due to some difficulties? This decision was taken by the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.