शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वायरमन कांदे काढायला जातात का?

By admin | Updated: June 11, 2015 06:02 IST

जिल्ह्यातील वीज समस्येबाबत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी असंख्य तक्रारी मांडल्या. वादळात पडलेले पोल तसेच पडून

पुणे : जिल्ह्यातील वीज समस्येबाबत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी असंख्य तक्रारी मांडल्या. वादळात पडलेले पोल तसेच पडून आहेत, अडथळा ठरणारी झाडे कापली जातात, डीपी जळाल्याने गावे १५-१५ दिवस आंधारात असतात, खांबावर गावातील तरुणांना चढवून कामे करून घेतात... मग वायरमन काय कांदे काढायला जातात का? असा सवाल करण्यात आला.सर्वसाधारण सभेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. या वेळी सदस्यांनी आपापल्या भागातील तक्रार मांडल्या. मात्र, महावितरणचे मुख्य अधिकारी तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अधिकारी न आल्याने २० जून रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.मात्र, ज्या विभागातील अधिकारी आले होते, त्यांच्याकडे सदस्यांनी तकक्रारी मांडल्या. खेड तालुक्यातील सिद्धी गव्हाण, ठाकूरवाडी येथे आठवडाभर वीज नाही. वादळात पडलेले पोल तसेच पडून आहेत; मात्र महावितरण तक्रारी करूनही दखल घेत नाही, अशी विचारणा झाल्यानंतर दोन दिवसांत काम पूर्ण होईल, असे अश्वासन देण्यात आले. शिवसेनेचे कुलदीप कांडे यांनी, एकीकडे झाडे जगवा असे सांगितले जाते; मात्र दुसरीकडे अडथळा ठरणाऱ्या झाडांची महावितरण कत्तल करते. गरीब शेतकरी या झाडांना जिवापाड संभाळतात. मात्र, ती तोडताना महावितरण त्याचा विचार करीत नाही. तारांना झोळ आले आहेत, पोल जर्जर झाले आहेत, ते कधी पडतील याची शाश्वती नाही. त्यामुळे महावितरणने निदान पुढील पावसाळ्याच्या दिवसांत आपत्ती कक्ष उभारून तत्काळ वीजपुरवठा होईल, याची काळजी घ्यावी, अशी सूचना केली. वाफगावच्या वाकडवस्तीला वीज कनेक्शन नाही. (प्रतिनिधी)