शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 4:27 PM

बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी दिली महापालिका आयुक्तांना तंबी..

ठळक मुद्देशहरातील ३२३ रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी केला विरोध

पुणे : ठराविक बांधकाम व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून पालिकेच्या हद्दीतील ३२३ रस्ते सहा मीटर ऐवजी ९ मीटर करण्याचा निर्णय घेऊ नका. शहराच्या विकासाच्यादृष्टीने सर्व पक्षांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालिका आयुक्तांना दिले.बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशी तंबीही पवार यांनी यावेळी दिली.शहरातील ३२३ रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे टीडीआर वापरता येणार आऊन यातून पालिकेचे उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी विरोध केला असून हा याबाबत पत्रकार परिषद घेऊन प्रमुख तीनही पक्षांनी हा प्रकार काही ठराविक बिल्डरांच्या हितासाठी घेतला जात असल्याचा आरोप केला होता.

त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, सुनिल टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांनी पालकमंत्री पवार यांची शनिवारी सकाळी काऊन्सिल हॉल येथे भेट घेतली. पालिका आयुक्त शेखर गायकवाड हेही उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱयांनी ठराविक बांधकाम व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ठराविक भागातील रस्ते रुंद करण्याचा प्रस्ताव आणल्याचे सांगत विरोध दर्शविला. हा प्रस्ताव बांधकाम विभागाने आणला असून पथ विभागाने का नाही आणला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मध्यवस्तीतील वाडे, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. रस्ता रुंदीकरण झाल्याशिवाय टीडीआर वापरता येणार नाही अशी अट टाकण्याची मागणी सर्वांनी केली. यासोबतच सहा मीटर रस्त्यावर सरसकट टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी शहरातील अन्य रस्त्यांचेही टप्याटप्याने रुंदीकरणाचे प्रस्ताव आणणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यावेळी पालकमंत्री पवार यांनी पालिकेचे सत्ताधारी भाजपाचे बहुमत आहे. बहुमताच्या जोरावर कोणताही निर्णय घेऊ नका. करायचे तर सर्वच रस्ते सरसकट रुंद करा. मध्यवस्तीमधील रस्त्यांचा समावेश करून रुंदीकरणाबाबात धोरण तयार करण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेनाcommissionerआयुक्तMayorमहापौरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा