शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अमली पदार्थाच्या आहारी जाऊ नका : प्रतिभा पाटील; डी. वाय. पाटील विद्यापीठात पदवीप्रदान समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 3:39 PM

विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन स्वत: चे व कौटुंबाचे जीवन अस्थिर करू नये, असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देडॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दुसरा पदवी प्रदान समारंभविद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील संशोधन करण्याकडे लक्ष द्यावे : प्रतिभाताई पाटील

पुणे : प्रत्येक विद्यार्थ्याला रँगिंगमुक्त वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. तसेच विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन स्वत: चे व कौटुंबाचे जीवन अस्थिर करू नये, असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील , डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, डॉ. अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला आणि कायद्याचे अभ्यासक हुकम चंद शर्मा यांना उल्लेखनीय कायार्साठी पाटील यांच्या हस्ते डी. लिट. देवून सन्मानित करण्यात आले. प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्तम बदल घडवून आणण्याचे ध्येय ह्या विद्यापीठाने फार अल्प कालावधीत साध्य केले. हे अतिशय कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील संशोधन करण्याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे आपल्या क्षमता व गुणवत्तेचे रुपांतर स्वत: च्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी करावे.विद्यापीठची शैक्षणिक गुणवत्ता राखण्याबरोबरच सामाजिक भावनेतून विद्यापीठासाठी काम करत राहणार असल्याचे नमूद करून डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ. एकनाथ खेडकर यांनी विद्यापीठाचे यश, योजना आणि नवनवीन उपक्रमांची महिती दिली. तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमात अंकिता सुदा, श्रद्धा केळकर, आशिष घनश्याम र्ब्वे, तेजस माणिक, अक्षय भोसले, मोहद जाहिद या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात आले.

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलPuneपुणे