शहरावर नशाखोरांचा अंमल; पाऊण कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:25 AM2018-01-10T03:25:17+5:302018-01-10T03:25:30+5:30

गोवा आणि मुंबईइतके प्रमाण नसले, तरी शहरात कोकेन, अफू, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन, मेफेड्रोन असे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षभरात पाऊण कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असून, ६५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

The city is addicted to drugs; The drug seized worth Rs 30 crore | शहरावर नशाखोरांचा अंमल; पाऊण कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

शहरावर नशाखोरांचा अंमल; पाऊण कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

Next

पुणे : गोवा आणि मुंबईइतके प्रमाण नसले, तरी शहरात कोकेन, अफू, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन, मेफेड्रोन असे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षभरात पाऊण कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असून, ६५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या आठवड्यात अमली पदार्थविरोधी पथकाने ६७ ग्रॅम ब्राऊनशुगर जप्त केले. त्याची किंमत
दोन लाख १ हजारइतकी आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत गांजा आणि
त्यापासून तयार केलेल्या तरंग गोळ््या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मेफेड्रोन हा मादक पदार्थदेखील येथे उपलब्ध होत आहे. नशेबाजांमध्ये चॅवमॅव या नावाने मेफेड्रोन अथवा एमडी हे अमली पदार्थ प्रसिद्ध आहेत. शहरात वर्षभरात २२७ किलोंहून अधिक विविध प्रकारचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत ७७ लाख ६६ हजार ३९० इतकी भरते.
पूर्वी शहरात अमली पदार्थ विक्री करणाºयांचे ठराविक ठिकाण असे. मात्र पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते सतत आपला ठिकाणा बदलत असतात. त्यांच्याकडे येणारा संबंधित ग्राहकदेखील कोणाच्या तरी शिफारशीवरूनच आलेला असतो. त्या ग्राहकाला ठराविक ठिकाणी बोलावून घेऊन अवघ्या काही सेकंदात त्याच्या हातात अमली पदार्थाची पुडी देऊन ते पसार होतात.

- ब्राऊनशुगर विक्रीमध्ये नायजेरियन तरुणांचा मोठा सहभाग असतो. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी नायजेरियन सापडल्यास, न्यायालयात दोषारोपपत्र सादर होईपर्यंत व शिक्षा होईपर्यंत त्यांना येथेच राहावे लागते. या काही महिन्यांच्या कालावधीत ते पुन्हा अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१७ पर्यंतची कारवाई
अमली पदार्थ केसेस वजन किंमत आरोपी
कोकेन २ १२.५७ ग्रॅ. १,२५,००० २
गांजा, गांजामिश्रित ३६ २१६ किं. ३२,७९,९७० ३९
तरंग गोळ््या
ब्राऊनशुगर-हेरॉईन १० ३६५.७८० ग्रॅ. १६,९९,१८० १३
अफू ४ ९.४४८ कि. १६,८८,४७० ४
चरस १ १.२२० कि. २,५०,००० २
मेफेड्रोन, एमडी, ३ १४२ ग्रॅ. ७,२३,६०० ५
चॅवमॅव
एकूण ५६ - ७७,६६,४९० ६५

Web Title: The city is addicted to drugs; The drug seized worth Rs 30 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.