शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

कौशिकीच्या अभंगाने पहाट मैफलीत' स्वरचैतन्य' 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 10:02 AM

रसिकांना स्वरमंडपाकडे खेचून आणण्याची जबरदस्त ताकद ज्यांच्या कंठ स्वरामध्ये आहे, असे रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती.

पुणे - रसिकांना स्वरमंडपाकडे खेचून आणण्याची जबरदस्त ताकद ज्यांच्या कंठ स्वरामध्ये आहे, असे रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती. त्याच्या रसपूर्ण गायकीतून  एक अवीट गोडीचा श्रवणानंद अनुभवास मिळत असल्याने त्याच्या मैफिलीला हमखास 'कानसेनांची' गर्दी होते... गुरुवारी त्याचीच  प्रचिती आली. 'याची देही याची डोळा' हा सुरांचा अनोखा साक्षात्कार अनुभवण्यासाठी' दर्दी 'पुणेकरांनी गर्दी केली होती. कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या मधुर गायकीमधून स्वरांची मुक्तपणे उधळण केल्याने रसिकांची दिवाळी पहाट' स्वरचैतन्य' मयी झाली.

पंडित विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणेच्या काहीशा मंजूळ आणि आर्त सुरावटीने एका वेगळ्याच सांगीतिक 'विश्वा' ची अनुभूती रसिकांना दिली. मोहनवीणे सह पंडित विजय घाटे व पंडित भवानी शंकर यांच्या तबला आणि पखवाज यांच्या जुगलबंदीने प्रसन्न वातावरणात सुरांचे अनोखे रंग भरले.

निमित्त होते, युवराज ढमाले कॉर्पस प्रस्तुत आणि फिनॉलेक्स पाईप्स व पीएनजी यांच्या सहयोगाने आयोजित लोकमत ' स्वरचैतन्य' दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे. पंडित विश्वमोहन भट यांच्या मोहननविणा सादरीकरणाने कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली. 

कोकिळचा मंजूळ स्वर आणि देवाला आळवणी करणाऱ्या भजनाच्या मोहनवीनेवर छेडल्या गेलेल्या तारा. यातून आसमंतात जणू मांगलयतेचे दीप प्रजवलीत झाल्याची प्रचिती आली. 1994 मध्ये ज्या रचनेला ग्रामी अवॉर्डचा सन्मान मिळाला त्या सुरांची जादू रसिकांनी अनुभवली. या अदभूत अविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मोहनविना हे तंतूवाद्य तर  तबला आणि पखवाज हे तालवाद्य. या सूर आणि तालेच्या मिश्रणातून साकार झालेल्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली. 

हार्मोनियमवर तन्मय देवचक्के, तानपुऱ्यावर मेघोदीपा गांगुली आणि कीर्ती कस्तुरे व तबल्यावर पंडीत सत्यजित तळवलकर यांनी साथसंगत केली. राग बिलासखानी तोडीने कौशिकी यांनी मैफलीला प्रारंभ केला. आपल्या लडिवाळ गायकीतून चारुकेशी रागातील 'हरी गुण गावो' ही  बंदिश त्यांनी सुंदरपणे खुलवली. ललित पंचम रागातील बंदीशीचे सादरीकरणही त्यांनी केले. ' आता कुठे धावे मन' या मराठी अभंगाने मैफलीचा समारोप करीत  कौशिकी यांनी रसिकांचा पाडवा 'गोड' केला. 

'खूप वर्षांनी सकाळची मैफल सादर करण्याची संधी मिळाली आहे. सकाळच्या वातावरणात गाणं ऐकणं ही श्रवणीयतेची अनुभूती देणारे असते. पुणेकरांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे या शहरात नेहमीच कार्यक्रम करायला आवडते'. मी बंगालची असले तरी कर्माने महाराष्ट्रीयन आहे.    

- कौशिकी चक्रवर्ती, युवा गायिका

टॅग्स :DiwaliदिवाळीmusicसंगीतPuneपुणे