शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

IAS पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण स्थगित; मसुरीतून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 17:48 IST

पुढील कार्यवाहीसाठी कुठल्याही परिस्थितीत मसुरी येथे रिपोर्ट करा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत

पुणे: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जिल्हा प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारला लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरीतून सूचना करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी कुठल्याही परिस्थितीत मसुरी येथे रिपोर्ट करा असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार खेडकर यांचे काम स्थगित करून त्यांना मसुरीला पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण सुरूवातीला ३ जून २०२४ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झालं होतं. प्रोबेशन काळात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवत गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारीच मलाही ऑफिस पाहिजे अशी मागणी केली. खाजगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला. एकच नाही तर या गाडीला लाल आणि निळा दिवाही लावून घेतला. यानंतर त्यांची बदली वाशीमला करण्यात आली. 

खेडकर मॅडमचे याच काळात अनेक कारनामे समोर येऊ लागले. त्यांच्या आईने पोलिसांना, मुळशीत शेतकऱ्यांना दमदाटी करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. तर वडील आयएएस अधिकारी असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब पुढे आली. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी ११ वेळा परीक्षा दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, परीक्षेच्या नियमानुसार यूपीएससी परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ६ प्रयत्न असतात; तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा ९ आहे. मग पूजा खेडकर या तब्बल ११ वेळा परीक्षा देऊ शकतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. तर दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवली होती. ते प्रमाणपत्र बनावट असल्याने चौकशीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून त्या संदर्भातील अहवाल मागवला आहे. अहवालानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील, असे बोलले जात आहे. अशातच त्यांना प्रशिक्षण थांबवून मसुरीला पुन्हा बोलावले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्तEducationशिक्षणWomenमहिलाias pooja khedkarपूजा खेडकर