शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 9:33 PM

शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या.

ठळक मुद्देइतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय

पुणे : सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियमानुसारच बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही जण नाराज असणार आहेत. काहीचे डिफॉल्ट रिपोर्ट नुसार बदली झाली आहे. ज्या पोलिसांचे खरेच महत्वाचे कारण आहे. त्यांचा विचार केला जाईल.  त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अन्यथा इतरांना बदलीच्या ठिकाणी जावेच लागेल, असे स्पष्ट संकेत पुणे़ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी दिले. 

पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय व अन्य विभागांमध्ये ६ वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या पोलिसांची, तसेच विनंती अर्ज व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा पोलिसांच्या पोलीस प्रशासनाकडून बदल्या केल्या जातात. गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर १२८९ पोलिसांच्या बदल्यांचा आदेश काढला. या बदल्यामध्ये पोलीस हवालदार ४७६, सहायक फौजदार ६२, पोलीस नाईक ३२३, पोलीस शिपाई ४०८ यांचा समावेश आहे. 

नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी १२८९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र त्यामध्ये मुदतपूर्व बदली व प्रशासकीय बदली झालेल्या काही नाराज पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली बदली रद्द व्हावी, यासाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. कित्येक वर्षानंतर अशाप्रकारे इतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय झाला आहे.           मुदतपूर्व व प्रशासकीय बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही बदली रद्द करावी, यासाठी सोमवारी सकाळपासून पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. या सर्वांचे म्हणणे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ऐकून घेतले. त्यात प्रामुख्याने अनेकांनी बदलीचे ठिकाण लांब आहे. वैद्यकीय कारणामुळे बदलीच्या ठिकाणी हजर होणे गैरसोयीचे असल्याची कारणे सांगितली. मंगळवारीही काही कर्मचारी येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.़़़़़़

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसcommissionerआयुक्त