शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस चर्चा', सुप्रिया सुळेंचे खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 11:06 IST

माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता असून मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते

इंदापूर : बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक हा भातुकलीचा खेळ करुन टाकला आहे. माझी लढाई वैयक्तिक कुणाशी ही नाही. राजकीय, वैचारिक लढाई आहे. माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस, त्या जागेवर व कोणत्या ही व्यासपीठावर येऊन चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे खुले आव्हान खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि.२२) शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.    संविधानाची अंमलबजावणी जेथे होते ते मंदीर म्हणजे संसद आहे. त्यामुळे तुम्ही बारामतीची निवडणूक हलक्यात घेता, तशी ती हलक्यात घेत नाही. माझ्या विरोधात उभे राहिल हे मला माहिती नाही. त्याचे उत्तर महायुतीच देईल. लोकशाहीत दोन वेगळे विचार मांडण्यात येत आहेत. माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता आहे. मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते,असे ही त्या म्हणाल्या.    मराठा, धनगर, लिंगायत ,मुस्लिम भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या खुप वर्षापासूनच्या मागण्या आहेत. आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन असंवेदनशील आहे. खोट बोल पण रेटून बोल असा प्रकार करत आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकारची आरक्षणाबाबतची जी भूमिका आहे ती अतिशय फसवी व दुर्देवी आहे. या मध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे, असे सुळे म्हणाल्या. दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. तीनशे खासदार,दोनशे आमदार असे पाशवी बहुमत असताना आरक्षणाबाबत ते कसला ही निर्णय घेत नाही. जरांगे-पाटलांसारखा माणूस आंदोलने करतो. त्यावेळी मंत्री त्यांना भेटायला जातात. मात्र प्रश्न सुटत नाही. सरकार जरांगे व मराठी माणसांची फसवणूक करत आहे. जरांगे यांना सतत आंदोलने का करावी लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  भाजपमध्ये सध्या इनकमिंगला महत्व आहे. तुम्ही भ्रष्टाचार करा लगेच आम्ही आरोप करणार. दुस-या दिवशी तुमचा पक्षप्रवेश घेणार. चौथ्या दिवशी तुम्हाला एक मोठे पद देणार ही त्यांची सध्याची आदर्श पॉलीसी ठरली आहे. 'भ्रष्टाचारमुक्त भारत', 'न खाऊंगा न खाने दुंगा'चे काय झाले देवालाच ठाऊक अश्या शब्दात सरकारचे वाभाडे काढत त्या म्हणाल्या की, विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोठी आंदोलने उभारणारे प्रकाश जावडेकर, २०१४ मध्ये भाजप सत्तेत यावा यासाठी याच्यासाठी झटणा-या, खुर्च्या, सतरंजा उचलणा-या माधव भंडारींसारख्या कार्यकर्त्यांना काय मिळाले. ते ज्यांच्याशी लढले ते सत्तेच्या पंक्तीत चांदीच्या ताटात जेवत आहेत. भाजपला सत्तेवर आणण्यासाठी पराकाष्ठा करणा-या गोपीनाथ मुंडे  कुटुंबाकडे लक्ष द्यायला आत्ता सरकारला वेळ नाही. १०५ आमदार निवडून आणणा-या देवेंद्र फडणवीसांनी होते. ४० आमदारांच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच गडकरी मुंडे देवेंद्र फडणवीस या मराठी माणसांचा द्वेष करते असा घणाघात खा. सुळे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारण